Darshana Pawar Death Case saam tv
महाराष्ट्र

Darshana Pawar Death Case: MPSC पास तरुणीच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; शवविच्छेदन अहवालातून खळबळजनक माहिती समोर

साम टिव्ही ब्युरो

Shocking twist in Death Case of MPSC Pass Girl: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करून अधिकारी झालेली अहमदनगर जिल्ह्यातील तरुणी दर्शना दत्ता पवार हिच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे.

या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दर्शना दत्ता पवार (वय २६) असे मृत तरुणीचे नाव असून ती मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील आहे. दर्शनाचा मृतदेह रविवारी वेल्हे तालुक्यातील राजगड परिसरात सडलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

रविवारी किल्ले राजगडच्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ येथे तिचा मृतदेह अर्धवट सडलेल्या स्थितीत आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालातून तिच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Breaking News)

दर्शना पवार ही अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या संजीवनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कॉलनी, सहजानंदनगर येथील रहिवाशी होती. तिची नुकतीच रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदावर नव्याने निवड झाली होती. ती एमपीएससी परीक्षेत राज्यात सहावी आली होती.

९ जून रोजी दर्शना ही पुण्यातील एका खाजगी अकॅडमी मध्ये सत्कार स्विकारण्यास आली होती. दुसर्‍या दिवशी १० जून रोजी दर्शनास दिवसभर घरातील व्यक्तींकडून फोन करीत असताना घरातील कोणत्याही व्यक्तीचे फोन तीने उचलले नाहीत दरम्यान मुलीच्या वडिलांनी १२ जून रोजी पुणे येथे येऊन अकॅडमी चौकशी केली असता मुलगी दर्शना ही तिचा मित्र राहुल दत्तात्रेय हंडोरे यांच्यासोबत सिंहगड आणि राजगड किल्ले फिरण्यासाठी गेली असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Political News)

त्यानंतर तिचा शोध चालू होता. दरम्यान रविवारी १७ जून रोजी किल्ले राजगडच्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ येथे तिचा मृतदेह अर्धवट सडलेल्या स्थितीत आढळून आला होता. दर्शना पुण्यातून १२ जून पासून बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये दाखल होती. दरम्यान या घटनेबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात मुलीचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी फिर्याद दिली होती.

या घटनेबाबत पुणे ग्रामीणचे अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे अधिक तपास करीत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT