Pune Crime Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime : प्रेमभंगातून तरुणाचे धक्कादायक कृत्य; डिलिव्हरी बॉय म्हणून येत प्रेयसीवर रोखली पिस्तूल, तरुणी थोडक्यात बचावली

Pune News : २०२२ पासून तरुणी आणि सदर तरुणाचे प्रेमसंबंध होते. मात्र, नुकतेच त्याचे ब्रेकअप झाले होते. यातून चिडून जाऊन तरुणाने तरुणीला इंटर्नशिपचा कंपनीतील आवारात गाठून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला

Rajesh Sonwane

अक्षय बडवे 
पुणे
: प्रेमात आकांत बुडालेल्या तरुण- तरुणींना काही भान नसते. मात्र प्रेमभंग झाल्यानंतर काहीतरी टोकाचे पाऊल उचलले जात असते. असाच प्रकार पुण्यात घडला असून ब्रेकअप झाल्यावर तरुणीने झिडकारल्याने एका तरुणाने प्रेयसीवर पिस्तुल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पिस्तुलातून गोळी न उडाल्याने तरुणी यात थोडक्यात बचावली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

पुण्यातील बाणेर भागातील एका खासगी कंपनीच्या आवारात सदरची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात २४ वर्षीय तरुणी एमबीए अभ्यासक्रम करत असून बाणेर भागातील एका खासगी कंपनीत ती प्रशिक्षण घेत आहे. तर तरुण देखील एका खासगी कंपनीत काम करतो. २०२२ पासून तरुणी आणि सदर तरुणाचे प्रेमसंबंध होते. मात्र, नुकतेच त्याचे ब्रेकअप झाले होते.

बोलण्यास नकार देताच काढली पिस्तूल 

दरम्यान शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ती कंपनीत जात होती. त्या वेळी आरोपीने तिला कंपनी इमारतीच्या परिसरात अडवले. यावेळी तरुणाने घरपोच खाद्यपदार्थ पोहोचविणाऱ्या डिलिव्हरी बॉय सारखा वेश परिधान केला होता. तसेच तोंडाला मास्क देखील लावला होता. तरुणीला अडविल्यानंतर त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने बोलण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याच्याकडील पिस्तुल काढत तरुणीच्या दिशेने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. 

तरुणी थोडक्यात बचावली 

सुदैवाने तरुणाने काढलेल्या पिस्तुलातून वेळेत गोळी उडाली नाही. यामुळे तरुणी या घटनेत वाचली आहे. मात्र हा प्रकार घडल्याने तरुणीने आरडाओरडा करताच तरुणाने तिथून पळ काढला. तर या प्रकरणी तरुणीने बाणेर पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर तरुणाचा शोध घेतला असता आरोपी तरुणाला आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ४ ने अटक केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : पुण्यासह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

Maharashtra Live News Update: नाशिकला २ दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट, गणपती विसर्जनावर पावसाचं सावट

GST Council: दिवाळीआधीच धमाका! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, या वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी

Tilgul Modak Recipe : सुबक कळीदार तिळगुळाचे मोदक, नैवेद्य खाऊन गणपती होईल खुश

Nagpur Explosion : मध्यरात्री नागपूरमध्ये RDX प्लांटमध्ये स्फोट, एकाचा मृत्यू, १७ जण जखमी, सहा जण ICU मध्ये

SCROLL FOR NEXT