Pune Crime Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime : हातचलाखी करत सराफा दुकानात हात साफ; बंटी- बबलीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, घटना CCTVत कैद

Pune News : पुण्यातील कॅम्प परिसरातील एका सराफी दुकानात चोरी झाल्याची घटना घडली होती. याबाबतची तक्रार लष्कर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

Rajesh Sonwane

अक्षय बडवे
पुणे
: दिवाळीच्या कालावधीत दागिने खरेदी करणाऱ्यांची सराफ दुकानात गर्दी होती. याचा फायदा घेत एका महिला व पुरुषाने दुकानात हातचलाखी करत दागिने लंपास केले होते. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला असता चोरी करणाऱ्या महिला व पुरुषाला पुण्यातील लष्कर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पुण्यातील (Pune News) कॅम्प परिसरातील एका सराफी दुकानात चोरी झाल्याची घटना घडली होती. याबाबतची तक्रार लष्कर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. यानंतर त्या ठिकाणी एक महिला आणि एका पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दुकानातून या जोडप्याने हातचलाखी करुन अंदाजे १५ हजार रुपये किमतीचे ३ जोडी सोन्याचे कानातले चोरून नेले होते. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाला होता. 

याच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणद्वारे यातील महिला आरोपी पुण्यात राहत असल्याचे मिळून आल्यानंतर लष्कर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्या सोबत असलेल्या साथीदाराला ताब्यात घेऊन त्या दोघांना अटक केली. 

शेखर वाणी आणि शिवानी साळुंखे असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. दरम्यान या बंटी आणि बबलीने यापूर्वी देखील पुणे शहरात २, मुंबई शहरात ३, ठाण्यात २, पिंपरी चिंचवडमध्ये २ तर सिंधुदुर्ग, सातारा शहरात १ अशा ठिकाणी चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT