Pune Crime Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime : गार वडापाव दिल्याचा राग; स्नॅक्स सेंटर मालकाला जबर मारहाण

Pune News : वडापाव मिळताच तो गार आहे; असं आरोपींनी त्यांना सांगितलं. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला

Rajesh Sonwane

पुणे : पुण्यातील बालेवाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाष्टा करण्यासाठी गेलेल्या दोन जणांनी थंड वडापाव दिल्याच्या रागातून दुकान चालकास जबर मारहाण केली. काचेची बरणी फेकून स्नॅक्स सेंटर चालकाला मारहाण करण्यात आली. यात सदर इसम जखमी झाला असून या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. 

पुणे (Pune) शहरातील बालेवाडी भागात शिवकृपा स्नॅक्स सेंटर आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता अंकुश कोंडीबा ढेबे व त्याचा एक मित्र स्नॅक्स सेंटरवर आले होते. त्यांनी स्नॅक्स सेंटर चालक प्रकाशचंद्र जोशी यांच्याकडे वडापावची ऑर्डर दिली. वडापाव मिळताच तो गार आहे; असं आरोपींनी त्यांना सांगितलं. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. यानंतर ढेबे व त्याच्या मित्राने जोशी याना मारहाण (Crime News) करण्यास सुरवात केली. 

दरम्यान दोघांनी दुकानातील चहाचा थर्मास खाली फेकून दिला. तर ढेबे याने काऊंटरवरील काचेची बरणी हातात घेऊन ती जोशी यांच्या दिशेने फेकून मारली. या घटनेत जोशींच्या डोक्याला व हाताला मार लागला. मारहाण केल्यानंतर त्या दोघांनी तिथून पळ काढला. सदर प्रकरणानंतर प्रकाशचंद्र जोशी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतुशृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अंकुश कोंडीबा ढेबे या तरुणासह त्याच्या एका मित्रावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT