Crime News In Pune Saam TV
महाराष्ट्र

Crime News In Pune : पुणे हादरलं! टॉयलेटमध्ये झाली प्रसूती, नवजात बाळ खिडकीतून फेकलं खाली, पुढे काय घडलं?

Crime News : तरुणीने केलेल्या या कृत्यामुळे सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune Schoking News : पुण्यातील सिंहगड शहरातून एक भयंकर घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय मुलीने दवाखान्यात एका लहान बाळाला जन्म दिला. बाळाला जन्म दिल्यावर या मुलीने त्या नवजात अर्भकाला खिडकीमधून खाली फेकून दिले आहे. तरुणीने केलेल्या या कृत्यामुळे सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. (Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सिंहगडच्या नवले रोडजवळ असलेल्या एका हॉस्पीटलमध्ये ही मुलगी उपचारासाठी दाखल झाली होती. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. १९ वर्षीय तरुणी सिंहगड रोडजवळ असलेल्या मानाजीनगर येथील गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत होती.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, नंदा ढवळे या महिलेने तरुणीविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तरुणी ८ महिन्यांची गर्भवती होती. मात्र तिने ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली. शनिवारी पोटात दुखू लागल्याने या तरुणीने दवाखान्यात धाव घेतली. आपल्या पाठीत दुखत असल्याचे तिने यावेळी डॉक्टरांना सांगितले.

त्यानंतर ती हॉस्पीटलच्या कॅज्युअल्टीमध्ये असलेल्या वॉर्डमध्ये गेली. इथे पोटातल्या वेदना वाढल्याने ती टॉयलेटमध्ये गेली. त्यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. आपली ही गोष्ट कोणाली कळूनये म्हणून तरुणीने या नवजात बाळाला थेट खिडकीतून खाली फेकले. यामध्ये नवजात अर्भक उंचावरुन खाली पडल्याने त्याचा तिथेच मृत्यू झाला. या घटनेत दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peanut Chocolate Recipe : फक्त ३ साहित्य वापरून बनवा कुरकुरीत आणि गोडसर शेंगदाणा चॉकलेट

Maharashtra Tourism: छत्रपती संभाजीनगरमध्ये वसलाय स्वर्ग,'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

Maharashtra Live News Update: पुण्यातील शिवसृष्टी 31 ऑक्टोबर पर्यंत सवलतीच्या दारात पाहता येणार

Elephant Tramples Tourist: बापरे! पर्यटकाच्या वागण्यावर भडकले गजराज; पाठलाग करत पायाखाली तुडवलं| Video Viral

मुंबईत दहीहंडी सरावात बाल गोविंदाचा मृत्यू, थर लावताना कोसळला, परिसरात शोककळा

SCROLL FOR NEXT