Pune Bhor News Saam tv
महाराष्ट्र

Water Shortage : भाटघर, नीरा देवघर धरणाने गाठला तळ; विहिरी आटल्याने पाणीटंचाईची समस्या

Pune Bhor News : भाटघर व नीरा देवघर या दोन्ही धरणातील पाण्याने तळ गाठला असून धरणांचे बुडीत क्षेत्र कोरडे पडू लागले आहे. यामुळे पाण्याचा तुटवडा जाणविण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे

Rajesh Sonwane

सागर आव्हाड 
भोर (पुणे)
: मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली असली तरी निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या अद्याप संपलेली नाही. धरणातील पाणी साठ्यात घट होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार भोर तालुक्यातील भाटघर व नीरा देवघर या दोन्ही धरणातील पाण्याने तळ गाठला असून धरणांचे बुडीत क्षेत्र कोरडे पडू लागले आहे. यामुळे पाण्याचा तुटवडा जाणविण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. 

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भाटघर व नीरा देवघर हि दोन धरणे आहेत. दरम्यान भाटघर धरणात गतवर्षी १५ मार्चला ८.७३ टक्के तर नीरा देवघरमध्ये ८.१९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तुलनेनं यंदा भाटघरमध्ये ०.२२ तर नीरा देवघर मध्ये ८.६१ टक्के जास्तीचा साठा शिल्लक आहे. भाटघर, नीरा देवघर, वीर, गुंजवणी अशा नीरा प्रणालीतील चारही धरणात १७.६४ टक्के पाणीसाठा असून गतवर्षी पेक्षा ६.८३ टक्के जास्त पाणीसाठा आहे.

दोन्ही धरणांनी गाठला तळ 
मागील महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक होती. ती आता काहीशी कमी झाली असून धरणातील पाणी साठा कमी होत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून होत असल्याने सततच्या पाणी विसर्गामुळे दोन्ही धरणांनी तळ गाठला असून भाटघर धरणात ८.९५ टक्के तर नीरा देवघर धरणात १६.८० पाणी साठा शिल्लक असून ‌भाटघर मधून १६६६ क्युसेक तर नीरा देवघर धरणातून ७५० क्युसेक पाण्याचा विसर्ग पॉवर हाऊस मधून सुरु आहे.

विहिरींनी तळ गाठल्याने पाणीटंचाई 
धरणांच्या पाणी पातळीत घट झाल्याने धरण श्रेत्रातील काही विहिरीनी देखील तळ गाठला आहे. त्यामुळे तेथील गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यंदाच्या उर्वरीत पाणीसाठ्यातून पाणी टंचाईचे संकट टाळण्यासाठी पुढील काळात धरणातून योग्य तो विसर्ग करुन धरणात मुबलक पाणीसाठा ठेवण्याची मागणी भागातील ग्रामस्थांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

SCROLL FOR NEXT