Bharati Vidyapeeth area Attempt to burn bar owner Video  SaamTV
महाराष्ट्र

Pune Bar Owner Burn : हॉटेलबाहेर हाणामारी करताना मालकाने हटकलं, पोरांचा बारचालकाला जाळण्याचा प्रयत्न; थरारक Video

Pune Bar Owner Attempt to Burn : बारमालक उपचारासाठी रुग्णालयात जात असताना त्यांना अडवून त्यांच्या अंगावर पेट्रोल फेकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घटली आहे.

Prashant Patil

पुणे : पुणे शहराला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. पण या शहरात गुन्हेगारीचं सत्र काही करता थांबत नाही. काल पहाटे शहरातील स्वारगेट बस डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. तर पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

पुण्यातील एका बारबाहेर गुंडागर्दी करत असलेल्या मुलांना हटल्याने त्यांनी चक्क बारमालकाला बेदम मारहाण केली. ते मुलं एवढ्यावरच थांबले नाहीतर त्यांनी, बारमालक उपचारासाठी रुग्णालयात जात असताना त्यांना अडवून त्यांच्या अंगावर पेट्रोल फेकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घटली आहे. भारती विद्यापीठ परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजीवनी बार अँड रेस्टॉरंटमध्ये काहीजण मारामारी करत होते. तेव्हा त्यांनी या मुलांना निघून जाण्यास सांगितलं. तेव्हा त्या मुलांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर बारमालक ससून रुग्णालयात जात असताना या तरुणांनी त्यांना अडवलं आणि त्यांची दुचाकी जाळली. या प्रकरणी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या अंगावर स्लॅब कोसळला

PM मोदींनी घेतली पाकिस्तानच्या पंतप्रधानांची सर्वांसमोर शाळा; दहशतवादाच्या मुद्द्यावर दिला कडक मेसेज

Bedsheet Clean : घरातल्या मळलेल्या पांढऱ्या चादरी कशा स्वच्छ कराव्यात? ही एक ट्रिक ठरेल सगळ्यात भारी

Bathroom Vastu Tips: घरातील बाथरूमविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहिती असायला हव्यात!

SBI Recruitment: बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, परीक्षाही होणार नाही, मिळेल ९३,००० पर्यंत मूळ पगार

SCROLL FOR NEXT