Baramati Crime  Saam tv
महाराष्ट्र

गुगलवर नाव शोध, मी मोठा ऑफिसर; मटन घ्यायला रांगेत उभं केल्याने ग्राहक भडकला, दुकानदारासोबत केलं हादरवणारं कृत्य

Baramati Crime news : बारामतीत मटन घ्यायला रांगेत उभं केल्याने ग्राहक भडकला. या ग्राहकाने दुकानदारासोबत हादरवणारं कृत्य केलं.

मंगेश कचरे

मटन रांगेत घ्यायला उभं केल्याने ग्राहक भडकला

आरोपीने मटन दुकानदाराचं अपहरण केलं

या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक

Baramati Crime News : 'मला रांगेत थांबायला वेळ नाही, मी मोठा आहे' अशी मग्रुरी दाखवणाऱ्या ग्राहकाने सहकाऱ्यांच्या मदतीने थेट मटन दुकानदाराचे अपहरण केलं. त्यानंतर दुकानदाराला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बारामतीत तालुक्यात घडली. ग्राहकाने दुकानदाराला थेट कोयता, बेल्ट आणि हातांनी बेदम मारहाण केली.

ज्ञानेश्वर भारत आटोळे हे 'जय भवानी मटन शॉप' चालवतात. या दुकानाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सुर्यनगरी येथील दुकानावर मटन खरेदीदरम्यान एका व्यक्तीने रांगेत उभे राहण्यास नकार देत 'गुगलवर माझं नाव शोध, मी मोठा ऑफिसर आहे' अशी दमदाटी केली. यावरून दोघांमध्ये वाद-विवाद झालाय. वजनाचा काटा उचलून मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तो व्यक्ती मटन घेऊन निघून गेला. ऑनलाईन पेमेंटवरून त्याचे नाव 'स्वागत हनुमंत सोरटे' असे असल्याचे समोर आले.

ज्ञानेश्वर आटोळे हे दुकानातील कामगारासह बाहेर असताना ऋषी गावडे याच्यासोबत नियोजन करून दोन गाड्यांमधून आलेल्या ५ इसमांनी त्यांना जबरदस्तीने एका कारमध्ये बसवलं. जळोची गावाच्या दिशेने नेताना व्हिडीओ कॉलद्वारे पूर्वी दुकानावर वाद घातलेला ग्राहकच संपर्कात होता. ' त्यानेच मारहाणीचे आदेश दिल्याचा दुकानदाराचा आरोप आहे. मी सांगितले तसेच करा, मला बघू द्या यात किती दम आहे, असं म्हणत त्याने आदेश दिल्याचा दुकानदाराचा आरोप आहे.

कन्हेरी रोड आणि जळोची ब्रिज परिसरात नेऊन मारहाण केली. 'तुला जिवंत सोडणार नाही' अशी धमकी देखील त्यांनी दिली. या दरम्यान पोलीस, पीडित व्यक्तीचा भाऊ आणि नातेवाईक घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी अपहरण करून मारहाण करणे असा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आरोपी ऋषी गावडे यास पोलिसांनी अटक केली. त्याला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात संकेत मुसळे, शितल बेंगारे राहणार पारवडी हे सुद्धा गुन्ह्यात सहभागी असल्याचे समोर आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली,नजर कैदेत ठेवलेले शिवसैनिक आक्रमक

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद झाला, तुम्हालाही ₹१५०० येत नाही? अधिकारी सांगणार अपात्रतेचं कारण

Rashmika Mandanna Coorgi Saree : रश्मिका मंदानाच्या 'कोडवा' स्टाइल साडीची बातच न्यारी; 'अशी' नेसा, सर्वजण पाहातच राहतील

ABC Juice For Glowing Skin: ५० व्या वर्षीही दिसतेय विशीतली तरूणी! मलायका अरोराच्या ग्लोईंग स्किनचं सिक्रेट, काय आहे ABC ज्यूस

Lung cancer: नखांमध्ये हे बदल दिसले तर समजा फुफ्फुसांचा कॅन्सर झालाय; काय आहेत लक्षणं वाचा

SCROLL FOR NEXT