Mahabaleshwar, Panchgani, Traffic Diverted, Satara News saam tv
महाराष्ट्र

Mahabaleshwar News : पर्यटकांनाे ! शुक्रवार, शनिवार, रविवार महाबळेश्वर पाचगणीला जाणार आहात ? वाचा वाहतुकीतील महत्त्वपूर्ण बदल

या वाहतुक बदलाबाबत काही हरकती असल्यास disttraffic.satara@mahapolice.gov.in या संकेतस्थळावर पाठवाव्यात.

ओंकार कदम

Mahabaleshwar Traffic Diversion News : महाबळेश्वर आणि पाचगणीला येणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी बातमी. आता या दोन्ही पर्यटन ठिकाणावर यायचं असेल तर वाहतूक व्यवस्थेत जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी मोठा बदल केला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून (ता. 7) 25 जून पर्यंत प्रायाेगिकतत्वावर करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश एसपी समीर शेख यांनी दिले आहेत. (Maharashtra News)

महाबळेश्वर आणि पाचगणी या दाेन्ही शहरांत पर्यटकांना वाहतूकीच्या कोंडीला सातत्याने सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे या समस्येवर कायम स्वरुपी उपाय याेजना काढण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत.

त्यासाठी आजपासून (7 जून ते 25 जून) प्रत्येक शुक्रवार,शनिवार आणि रविवारी प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणा-या नव्या मार्गाचा महाबळेश्वर आणि पाचगणीला जाणा-या पर्यटकांना वापर करावा लागणार आहे. या नवीन निर्णयाचा वाहतूक व्यवस्थेवर किती परिणाम होतो हे पाहून आगामी काळात महत्त्तवपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

वाहतूक व्यवस्थेत बदल

मुंबई आणि पुण्याकडून येणाऱ्या वाहनांनी वाईमार्गेच प्रवास करावा.

महाबळेश्वरहून येणाऱ्या वाहनांनी या रस्त्याचा वापर करु नये. मेढा, कुडाळ पाचवड फाटा या रस्त्याचा वापर करुन महामार्गाला जावे.

पाचगणी कडून पुणे मुंबईला जाणाऱ्या वाहनांसाठी रुईघर, कुडाळ, पाचवड फाटा मार्गे महामार्गाला जावे.

महाबळेश्वर कडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी मेढा, सातारा मार्गे जावे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT