Pune Anganwadi where 20 toddlers were allegedly locked inside while staff attended a meeting. Saam Tv
महाराष्ट्र

चिमुकल्यांना कोंडून अंगणवाडीसेविका बैठकीला, अंगणवाडीसेविकेचा प्रताप, पालकांचा संताप

Anganwadi Worker: पुण्यात अंगणवाडी सेविकेनं 20 लहान मुलांना कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पण सेविकेने असं का केलं?

Mruga Vartak

मुलं ही देवाघरची फुलं असतात असं आपण म्हणतो, मात्र पुण्यातल्या हिंजवडीत 20 लहान मुलांना कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना घडलीय. अंगणवाडी सेविकेनं चक्क चिमुकल्यांना खोलीत कोंडून माजी सरपंचाच्या बैठकीला उपस्थिती लावली..असहायता आणि भितीनं मुलांची गाळण उडाली आणि बंद खोली या मुलांनी आक्रोश सुरू केला.

नेमकं काय घडलं ?

माजी सरपंचानं बैठक बोलावली होती. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना बैठकीला जायचे होते. मात्र 20 लहान मुलांची जबाबदारी कोण घेणार? म्हणून त्यांना बंद खोलीत कोंडले. खोलीला कुलूप लावून त्या थेट बैठकीला निघून गेल्या. चिमुकल्यांनी खिडकीतून आक्रोश केल्यानंतर हा प्रकार समोर आला.

अंगणवाडीत ५ वर्षांखालची मुलं असतात. या लहान मुलांना आई बाबांशिवाय एकटं राहायची सवय नसते. त्यांना मोठ्या विश्वासाने पालक अंगणवाडीत सोडतात. त्यामुळे त्यांना असं वाऱ्यावर सोडून जाणं कितपत योग्य आहे? याचा मुलांच्या कोवळ्या मनावर आघात होऊ शकतो. त्यामुळे या अंगणवाडीसेविकेसह मदतनीसावर कारवाई करण्याची मागणी होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT