Pune Ambegaon News Saam tv
महाराष्ट्र

Zilha Parishad School : ग्रामपंचायतीनेच लावला गावच्या शाळेला चुना; निकृष्ट दर्जाच्या कामाने छताला गळती

Pune Ambegaon News : जिल्हा परिषद शाळेचे काम करण्यासाठी सर्व शिक्षा अभियानातुन ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी दोन टप्प्यात मंजुर जाला असताना इमारत उभारणीचे काम हाती घेण्यासाठी ग्रामपंचानेच पुढाकार घेतला

रोहिदास गाडगे

पुणे : गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतींमार्फत निधी दिला जात असतो. मात्र अनेक ठिकाणी या निधीत अपहार झाल्याचे समोर आले आहे. असाच प्रकार आंबेगाव तालुक्यातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीत समोर आला आहे. यात वरसावणे गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने इमारतीला पाण्याची गळती लागली असुन या कामाची ठेकेदार असलेल्या गावच्या ग्रामपंचायतीनेच गावच्या शाळेला चुना लावल्याचे बोलले जात आहे. 

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या वरसावणे या गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. माजी मंत्री दिलीप वळसेपाटील यांच्या मतदार संघातील आदिवासी भागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीतील वरसावणे गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी सर्व शिक्षा अभियानातुन ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी दोन टप्प्यात मंजुर झाले होते. शाळेचे काम करण्यासाठी ठेकेदार नेमताना ग्रामपंचायतीनेच पुढाकार घेतला. 

छताला लागली गळती 

शाळेचे काम स्वतः ग्रामपंचायतीने घेऊन सबठेकेदार नेमला. यानंतर ग्रामपंचायतीने दिलेल्या शाळेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने शाळेच्या छताला पावसात गळती लागली. यामध्ये छत, खिडकी, भिंती आणि ध्वजाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत धरुन शाळेत शिक्षण घेत असताना दिसून येत आहेत. आता पालकांनी मुलांची व्यवस्था अंगणवाडीत करत ग्रामपंचातीनेच गावच्या शाळेला चुना लावल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. 

जुनीच शाळा बरी म्हणण्याची वेळ 

आंबेगाव तालुक्यातील बोरघर परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसात शाळेची अवस्था दैयनीय झाल्याने आमची जुनीच शाळा बरी होती; अशी म्हणण्याची वेळ पालकांसह ग्रामस्थांवर आली आहे. मात्र विकास कामांच्या वलघणा करणारे नेते पुढारी मंडळी या शाळेच्या दुरावस्थेकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Symptoms: लिव्हर खराब होण्यापूर्वी शरीर देतं 'असे' संकेत, जाणून घ्या कोणती आहेत ती लक्षणं...

Maharashtra Live News Update: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून निषेध

Online Scam: तुमच्या बँक बॅलन्सवर हॅकर्सची नजर; 'या' ट्रिक्सनं सुरक्षित ठेवा पैसा

तुम्ही 10 कोटींचा कुत्रा पाहिलाय का? व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल|VIDEO

मध्यरात्री ठो-ठो, गोळीबाराचा आवाज ऐकून नागरीक घाबरले, बिल्डरच्या ऑफिसवर ३० गोळ्या झाडल्या अन्...

SCROLL FOR NEXT