श्रीराम पवार लिखित 'अस्वस्थ पर्व' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न SaamTvNews
महाराष्ट्र

श्रीराम पवार लिखित 'अस्वस्थ पर्व' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

सकाळचे संपादक संचालक श्रीराम पवार लिखित अस्वस्थ पर्व या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते सातारा येथे पार पडला.

ओंकार कदम

सातारा : सकाळचे संपादक संचालक श्रीराम पवार लिखित अस्वस्थ पर्व या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते सातारा येथे पार पडला यावेळी साताऱ्यातील (Satara) निमंत्रित मान्यवर मंडळी उपस्थित होती. या सोहळ्यात बोलत असताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी सकाळचे (Sakal) संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या लेखणी वर कौतुकाचा वर्षाव केला. (Publication ceremony of the book 'Aswastha Parva' written by Shriram Pawar)

हे देखील पहा :

यावेळी बोलत असताना ते म्हणाले महाराष्ट्रात नव्हे, तर भारतातील आणि जगातील अस्वस्थ पर्व पहिल्यांदा विवेकानंदांनी शब्दबद्ध केले. स्वामी विवेकानंद यांनी जी अस्वस्थ पर्वाची मांडणी त्या वेळी केली. तशीच मांडणी श्रीराम पवार (Shriram Pawar) यांनी आज केली आहे. पुस्तकाच मुखपृष्ठ म्हणजे अस्वस्थ वर्तमान आहे. हे पुस्तक म्हणजे शिवधनुष्य उचलल आहे आणि शिवधनुष्य फक्त श्री रामच उचलू शकतात.

या सोहळ्याला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) हे देखील उपस्थित होते. श्रीराम पवार यांच्या पुस्तकाबाबत बोलत असताना पृथ्वीराज चव्हाण हे म्हणाले श्रीराम पवार यांनी परराष्ट्र धोरणावर उकृष्ठ लिहलं आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचकांना प्रेरणा देणारे पुस्तक आहे. त्याचप्रमाणे वाचकांमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींच कुतूहल निर्माण करणारे हे पुस्तक असून भविष्यात या पुस्तकाकडे संदर्भग्रंथ म्हणून बघितलं जाईल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT