Prostitution  Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: डोंबिवलीच्या ग्रामीण भागात देहव्यापार; बंगल्याखालील खोल्यांमध्ये डांबलं होतं बांगलादेशी मुलींना

Dombivli Crime: या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आलेले पॅन कार्ड ,आधार कार्ड हस्तगत केलेत.

Bharat Jadhav

(अभिजित देशमुख)

Prostitution in Dombivli:

एका बंगल्याच्या खाली देह व्यापाराचा व्यवसाय चालू असल्याची घटना डोंबिवलीत घडकीस आलीय. डोंबिवलीच्या ग्रामीण भागातील हेदूटने परिसरात हा प्रकार समोर आलाय. एका सामाजिक संस्थेच्या मदतीने मानपाडा पोलिसांनी या रॅकेटचा भांडाफोड केला. (Latest News)

या प्रकारणात पोलीसांनी ७ पीडित मुलींची सुटका करत ५ दलालांना बेड्या ठोकल्यात. अटक आरोपींमध्ये बंगल्याच्या मालकाचा समावेश आहे. बंगल्याचा मालक योगेश काळण याला या रॅकेट बद्दल कल्पना होती, मात्र जादा भाड्याच्या लालसेपोटी तो देखील यात सहभागी झाला होता. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आलेले पॅन कार्ड ,आधार कार्ड हस्तगत केलेत.

पोलिसांनी उद्धवस्त केलेल्या रॅकेटमध्ये अजून काहीजणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. पोलिसांनी या प्रकरणात युनूस शेख उर्फ राणा,साहिल शेख फिरदोस सरदार, आयुबअली शेख,बीपलॉप खान यांच्यासह घरमालक योगेश काळण विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. त्यांच्याकडून २५ संशयित आधार कार्ड १० पॅन कार्ड , ४ जन्म दाखले बांगलादेश भारताच्या चलनी नोटा जप्त केल्यात.

पुण्यातील फ्रीडम फर्म या सामाजिक संस्था महिला आणि मुलीचा देह व्यापारातून सुटका करते आणि त्यांचे पुनर्वसन करते. दरम्यान ५ ऑक्टोबर रोजी या संस्थेच्या कार्यालयात बांगलादेशहून एक ईमेल आला. या ईमेलमध्ये एका १९ वर्षे मुलीला नोकरी लावण्याचा बहान्याने बांगलादेशहून भारतात आणले आहे. त्यात ती मुलगी सध्या कुठे आहे याची माहिती देण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून संस्थेच्या पदाधिकारी शिल्पा वानखेडे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पुण्याहून ठाणे गाठलं.

याबाबत मानपाडा पोलिसांसह अँटी ह्यूमन ट्रेकिंग सेलला माहिती देण्यात आली. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुऱ्हाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश मदने, राम चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे अविनाश वनवे यांच्या पथकाने तत्काळ डोंबिवली ग्रामीण मधील हेदूटने येथील घटनास्थळी धाव घेत ७ बांग्लादेशी मुलींची सुटका केली.

या मुलींची चौकशी केली असता युनिस शेख उर्फ राणा याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने या सर्व मुलींना नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशातून भारतात आणल्याची माहिती समोर आली. भारतात आणल्यानंतर युनिसने या मुलींना डोंबिवली ग्रामीण येथील एका घरामध्ये डांबून ठेवले होते. या मुलींना देहव्यापार करण्यास भाग पाडले. राणा आणि त्याचे साथीदार पलावा सिटीमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी पलावा येथे सर्च ऑपरेशन सुरू केलं.

यादरम्यान राणा आणि त्याच्या साथीदारांना पोलीस आपल्या मागावर असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी तेथून पळ काढला. आरोपींनी आंतरली गावाजवळ असलेल्या झाडी झुडपामध्ये आश्रय घेतला. पोलिसांनी पाठलाग करत मोठ्या शिताफीने या झाडी झुडपामध्ये त्यांचा शोध घेऊन ५ ही आरोपींना बेड्या ठोकल्या. दरम्यान हे रॅकेट हे हेदूटने मधील योगेश काळन यांच्या बंगल्याच्या खाली असलेल्या खोल्यांमध्ये सुरू होते. ज्यादा भाडे मिळत असल्याने योगेश काळनने याबाबत पोलिसांना माहिती दिली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT