eknath shinde  saam tv
महाराष्ट्र

विकासाला गती देण्यासाठी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा महत्वपूर्ण ठरेल: CM एकनाथ शिंदे

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीचा आराखडा सादर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पर्यावरण रक्षण हे आपले कर्तव्यच आहे.पण लोकहितांचे विविध प्रकल्प तसेच स्थानिकांच्या विकासाला गती मिळणे आवश्यक आहे.त्यासाठी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा महत्वपूर्ण ठरेल,’असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

महाराष्ट्र सागरी किनारा विकास प्राधिकरणाने तयार केलेला किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा आज मुख्यमंत्री शिंदे (Eknath shinde) यांना सादर करण्यात आला. पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीचा हा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा केंद्रीय पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडे पाठवण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. (Project of public interest coastal zone management plan)

मंत्रालयात समिती सभागृहात झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीस महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर,पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणु गोपाल रेड्डी,पशु संवर्धन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन,पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय,पर्यावरण विभागाचे संचालक नरेंद्र टोके आदी उपस्थित होते.

पर्यावरण विभागाचे सचिव दराडे यांनी हा पाच जिल्ह्यांसाठी असलेल्या आराखड्याचे सादरीकरण केले. किनारपट्टी क्षेत्राचे अधिनियमन-२०१९ नुसार हा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. त्यामध्ये चेन्नईच्या नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट या संस्थेने किनारपट्टीच्या क्षेत्राचे भरती व ओहोटी रेषेचे आलेखन केले. त्यावर पाच जिल्ह्यातून सूचना व हरकती मागवून हा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला.

यात सागरी नियमन क्षेत्राचे चार प्रकारात वर्गीकरण आहे. त्यामध्ये परिस्थिती दृष्ट्या संवेदनशील,विकसित भाग,ग्रामीण भाग आणि पाण्याचा भाग यांचा समावेश आहे.यात पूर्वीच्या २०११ च्या अधिसूचनेतील भरती रेषेपासूनची १०० मीटर अंतरापर्यंतची मर्यादा आता खाडी,नद्या,नाले या क्षेत्रांकरिता ५० मीटर पर्यंत करण्यात आली आहे.

यामुळे या पर्यटन उपक्रमांनाही चालना मिळणार आहे. स्थानिक मच्छिमारांना आणि पारंपरिक घरांच्या बांधकाम व दुरूस्तीची परवानगीची प्रक्रीयी सुलभ होणार आहे. निवासी घरांसाठी ३०० वर्ग मीटरपर्यंत बांधकामांसाठी स्थानिक नियोजन प्राधिकरण परवानगी देऊ शकेल,असे प्रस्तावित आहे.तसेच स्थानिक लोकांची जूनी घरेही नियमित केली जाऊ शकणार आहेत.

किनारपट्टीच्या भागामध्ये स्थानिक नागरिकांकरिता सामुदायिक पायाभूत सुविधा उभे करणे शक्य होणार आहे. स्थानिक कोळी बांधवांच्या मासेमारी व पारंपारिक व्यवसायासाठी आवश्यक अशा वाळवण, मासळी बाजार,जाळी बांधणी, होड्यांची दूरूस्ती यांनाही परवानगी दिली जाणार आहे.किनारपट्टी भागात राहणाऱ्या स्थानिक लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून उदरनिर्वाहासाठी घरगुती मुक्काम पर्यटन सुविधा देता येणार आहे.तसेच पर्यटन क्षेत्रासाठीच्या आवश्यक अशा समुद्रकिनारा शॅक (खोपटी),प्रसाधनगृहे,बैठक व्यवस्था आदी तात्पुरत्या पर्यटन सुविधांना परवानगी देणे शक्य होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT