"भिडे गुरुजींचा मला आदर आहे..." वादग्रस्त वक्तव्यावर अमृता फडणवीस यांचं भाष्य

प्रत्येकाच्या जीनवशैलीचा आदर करुन बोललं गेलं पाहिजे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं.
Sambhaji Bhide-Amruta Fadnavis
Sambhaji Bhide-Amruta FadnavisSaam TV
Published On

>> भारत नागणे

पंढरपूर : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे (sambhaji bhide) हे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आल्यानंतर संभाजी भिडे यांच्याशी 'साम'च्या महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलेन असं म्हणत भिडे यांनी बोलण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यावरे टीकेची झोड उठवली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील याबाबत आपली भूमिका मांडली. संभाजी भिडे यांच्याबद्दल आदर आहे. हिंदुत्ववादी विचारांचे ते स्तंभ आहेत. पण हिंदुत्वच शिकवतं की कुणी कसं जगावं हे ठरवण्याचा त्याला अधिकार आहे. प्रत्येकाच्या जीनवशैलीचा आदर करुन बोललं गेलं पाहिजे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं. कार्तिकी एकदशीनिमित्त त्या पंढरपुरात आहेत.

Sambhaji Bhide-Amruta Fadnavis
"महिला पत्रकाराला कुंकू लावण्यास सांगणारे संभाजी भिडे समाजातील विकृती"

संभाजी भिडे नेमकं काय म्हटलं होतं?

'साम'च्या महिला पत्रकारानं संभाजी भिडेंना प्रश्न विचारला की, "तुम्ही आज मंत्रालयात आला होतात तुम्ही कुणाची भेट घेतली?" यावर भिडे म्हणाले होते की, "तू आधी टिकली लावं, मग तुझ्याशी बोलेन. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही. तू कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो". या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वत स्तरातून टीका होत आहे.

Sambhaji Bhide-Amruta Fadnavis
Social Media : संभाजी भिडेंच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर #टिकलीचाआग्रहनकोच होतोय ट्रेंड

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याची दखल घेत संभाजी भिडे यांच्याकडून खुलासा मागवला आहे. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तुत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचवणारे आहे, असे आयोगाने म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा 1993 कलम 12 (2) व 12 (3) नुसार तात्काळ सादर करावा, अशी नोटीस महिला आयोगाकडून संभाजी भिडे यांना देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com