Priyanka Gandhi News, Narendra Modi News, Agnipath Scheme News Updates Saam TV
महाराष्ट्र

Priyanka Gandhi : जातनिहाय जनगणनेसाठी काँग्रेस आक्रमक; प्रियंका गांधींचे PM मोदींना ओपन चॅलेंज

Priyanka Gandhi on caste census : प्रियंका गांधी यांची शिर्डीत सभा झाली. या सभेत प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना ओपन चॅलेंज दिलं.

Vishal Gangurde

सचिन बनसोडे, साम टीव्ही

शिर्डी : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांना सभांचा धडाका लावला आहे. त्यांच्या प्रचारसभांमधून आरोपांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. एकीकडे वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधी मैदानात उतरल्या आहेत. यादरम्यान, प्रियंका गांधी यांनीही विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. शिर्डीतील सभेतून प्रियंका गांधींनी जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींना ओपन चॅलेंज दिलं आहे.

प्रियंका गांधी यांच्या भाषणातील मुद्दे

देशातील या भूमीने देशाला दिशा दाखवली आहे. स्वातंत्र्याची लढाई इथूनच मजबूत झाली. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. तोच साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा.

मराठीतून श्लोक म्हणत संत तुकारामांचा दाखला देत मानवतेचा संदेश दिला. साईबाबांचा समानतेचा मानवतेचा संदेश हाच खूप महत्त्वाचा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात सत्याची बाजू कुठे राहिली आहे? त्यांचे मंत्री असो अथवा आमदार काहीही बोलू शकतात. याच महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा देखील अपमान होत आहे.

संसदेबाहेरील शिवाजी महाराजांची प्रतिमा हटवली. सिंधुदुर्गातील पुतळा देखील पडला.

पंतप्रधान मोदी, मी राहुल गांधींची बहीण आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेते. बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा वेगळी होती. मात्र शिवाजी महाराजांचा अपमान त्यांनी सुद्धा सहन केला नसता.

मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देते की, त्यांनी जातीय जनगणना करणार असल्याचं एकदा जाहीर करावे. पंतप्रधान मोदी आता राहुल गांधींना घाबरू लागले आहेत, त्यांच्यावर टीका करण्याचं काम करतात.

नरेंद्र मोदींनी सगळ्यांना कमकुवत करण्याचं काम केलं. मात्र, उद्योगपतींना कर्जमाफी. शेतकऱ्यांना काय मिळालं. पैसे नसल्याचे सांगतात. मग, उद्योगपतींचे कर्ज माफ कसे झाले? तुम्हाला उत्तर द्यावे लागेल.

दोन लाख सरकारी पदे आज रिक्त आहेत. ती सुद्धा भरली जात नाही. युवक आत्महत्या करायला लागेल. जातीच्या नावावर लक्ष विचलित करण्याचं काम यांच्याकडून सुरू आहे.

संविधानाबाबत यांना गांभीर्य नाही. महाविकास आघाडी सरकार आलं आणि त्यानंतर पैसे, ईडीचा वापर करून सरकार तोडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

The Traitors Winner: उर्फी जावेद आणि निकिता लूथर ठरले 'द ट्रेटर्स'चे विजेते; ट्रॉफीसह मिळाणार कोट्यावधींचे बक्षीस

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चाँद नवाबनंतर आणखी एक पाकिस्तानी पत्रकार चर्चेत! समुद्राच्या खोलीचं रिपोर्टिंग करताना थेट समुद्रात मारली उडी

SCROLL FOR NEXT