Bus Accident Saam TV
महाराष्ट्र

Nashik Bus Accident: देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात; 13 जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने बसला अपघात झाला.

साम टिव्ही ब्युरो

>> तरबेज शेख

नाशिक : नाशिकमधील त्र्यंबकेश्वरजवळ एका खासगी बसला अपघात झाला आहे. बसमधील सर्व भाविक त्र्यंबकेश्वर येथून दर्शन करुन परतत असताना बसला अपघात झाला. या अपघातात 13 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.

बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने बसला अपघात झाला. बस रस्त्याच्याकडेला जाऊन उलटली. या बसमधील सर्व प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. सध्या जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वरजवळ ही भाविकांची मिनी बस उलटली आहे. बसमधील 29 पैकी 13 प्रवासी जखमी झाले आहेत. ब्रह्मगिरी पर्वतावरून परतल्यानंतर माघारी परतत असताना गंगाद्वार जाणाऱ्या ठिकाणी उतारावर बसला अपघात झाला.

उतारावरून खाली येत असताना संस्कृती हॉटेल पर्यटन केंद्र येथे वाहनावरील नियंत्रण सुटले व बस थेट नाल्यात पलटी होऊन समोरच्या झाडाला अडकली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT