Prithviraj Chavan 
महाराष्ट्र

माेठा भ्रष्टाचार पुढं येईल; पृथ्वीराज चव्हाणांना विश्वास

Siddharth Latkar

सातारा : जी गाेष्ट भारत देशात शाेधणे अशक्य आहे किंवा शाेधण्यासाठी प्रयत्न झालेच नसते ती गाेष्ट फ्रेंच एजन्सीच्या माध्यमातून पुढं येईल. एक माेठा भ्रष्टाचार उघडकीस येईल अशी अपेक्षा आणि विश्वास काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण prithivraj chavan यांनी राफेल लढाऊ विमानांच्या rafel fighter aircraft कथित गैरव्यवहार प्रकरणावरील झालेल्या निर्णायवरुन व्यक्त केला आहे. याबाबत आमदार चव्हाण यांनी ट्विट केले आहे. (prithviraj-chavan-rafelscam-france-india-rafel-fighter-aircraft)

फ्रान्स आणि भारत यांच्यात झालेल्या 59 हजार काेटी रुपयांच्या राफेल या लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारातील कथित गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी एका फ्रेंच न्यायाधीशाची नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये शाेध पत्रकाररितेसाठी प्रसिद्ध असलेले संकेतस्थळ 'मिडियापार्ट' ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर भारतात राजकीय धूरळा उडाला.

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या ट्विटमध्ये फ्रान्सने भ्रष्टाचा-यांना थारा दिलेला नाही. भ्रष्टाचारी लाेक ते सहन करीत नाहीत हे त्यांनी त्यांचे माजी अध्यक्ष निकोलस सरकोझी Nicolas Sarkozy यांच्या प्रकरणावरुन आपल्याला दिसून येते असे नमूद केले आहे. सरकाेझी यांना देखील फ्रान्सने वाचवले नाही.

फ्रेंचमधील भ्रष्टाचारविरोधी एजन्सी राफेल प्रकरणाची सत्यता समाेर आणेलच. जी गाेष्ट भारत देशात शाेधणे अशक्य आहे किंवा शाेधण्यात रसच नाही अशी गाेष्ट आता फ्रेंच एजन्सीच्या माध्यमातून पुढं येईल. एक माेठा भ्रष्टाचार उघडकीस येईल असा विश्वास आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

SCROLL FOR NEXT