फ्रान्समध्ये राफेल व्यवहाराची होणार चौकशी

राफेल फायटर विमान खरेदी व्यवहार प्रकरण भारतात शांत झाले होते. परंतु आता या व्यवहाराची चौकशी फ्रान्समध्ये होणार आहे.
फ्रान्समध्ये राफेल व्यवहाराची होणार चौकशी
फ्रान्समध्ये राफेल व्यवहाराची होणार चौकशीSaam Tv

पॅरिस: राफेल फायटर विमान Rafale fighter aircraft खरेदी व्यवहार प्रकरण भारतात India शांत झाले होते. परंतु आता या व्यवहाराची चौकशी फ्रान्समध्ये France होणार आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाचा भारतात पुन्हा एकदा राफेलवरुन धुरळा उडू शकतो. Raphael deal to be investigated in France

भारताबरोबर ३६ राफेल फायटर विमाने २०१६ साली फ्रान्सने विक्रीचा करार केला होता . या करारात भ्रष्टाचार Corruption आणि पक्षपात झाल्याचा आरोप होत होता. त्यामुळे फ्रान्समध्ये France आता या व्यवहाराची चौकशी होणार आहे. फ्रान्समध्ये ७.८ अब्ज युरो म्हणजेच ५९ हजार कोटींच्या व्यवहाराची न्यायिक चौकशी करण्यासाठी एका न्यायाधीशाची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

भ्रष्टाचार आणि पक्षपात झाल्याचा आरोप भारत सरकार आणि राफेलची निर्मिती करणाऱ्या डासूमध्ये झालेल्या करारात होत आहे. फ्रान्सच्या आर्थिक गुन्हे शाखेने Crimes Branch सांगितले आहे, याबाबतची चौकशी करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास स्वतंत्र न्यायदंडाधिकारी करणार आहेत. फ्रान्सचे तत्कालिन अध्यक्ष फ्रान्सवा ओलांदे France hollande यांची अन्य घटकांबरोबर कृती आणि निर्णयही तपासले जातील, असे फ्रेंच पब्लिकेशन मिडीयापार्टने माहिती दिली आहे.

फ्रान्समध्ये राफेल व्यवहाराची होणार चौकशी
शेतीच्या वादातून पाच जणावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

ज्यावेळी राफेलचा करार झाला त्यावेळी फ्रान्सवा ओलांदे हे फ्रान्सचे अध्यक्ष होते. सध्याचे अध्यक्ष असलेले इमॅन्युल मॅक्रॉन हे त्यावेळी अर्थमंत्री होते. राफेल प्रकरण मीडियापार्टने लावून धरले होते. या संदर्भात फ्रेंच एनजीओ शेरपाने तक्रार केली होती.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com