मीडियाच्या प्रश्नांवर भडकल्या प्रीतम मुंडे म्हणाल्या...
मीडियाच्या प्रश्नांवर भडकल्या प्रीतम मुंडे म्हणाल्या... Saam Tv
महाराष्ट्र

मीडियाच्या प्रश्नांवर भडकल्या प्रीतम मुंडे म्हणाल्या...

विनोद जिरे

बीड - "ऑन द रेकॉर्ड किंवा ऑफ द रेकॉर्ड" जसं तुम्हाला वाजवायचंय तसं तुम्ही वाजवा. जर खासदार म्हणून माझा आवाज तुम्हाला सक्षम वाटत नसेल तर मला मीडिया म्हणून तुमचा आवाज देखील सक्षम वाटत नाही असं मनात पत्रकारांच्या प्रश्नाला बगल देत खासदार प्रतिम मुंडे पत्रकार परिषदेत भडकल्या. बीड जिल्ह्यात देवस्थानच्या जमिनी लाटण्याचीचे प्रकार घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर नामलगाव येथील गणपती मंदिराच्या 26 एकर जमीन लाटणार्‍यावर गुन्हा दाखल झाला नाही.

हे देखील पहा -

एकीकडे आष्टीमध्ये गुन्हा दाखल होतो, मात्र बीडमध्ये होत नाही. यावर तुम्ही आवाज उठवणार का? हा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, यावर प्रीतम मुंडे म्हणाल्या, की 'जिथे जिथे अन्याय होताना दिसतो, तिथं तिथं आवाज उचलने हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही निश्चित करू'. असं म्हणत खासदार मुंडे यांनी प्रश्नाला बगल दिली.

मात्र, यावरही पुन्हा प्रश्न केला असता खासदार प्रीतम मुंडे भडकून म्हणाल्या, की ऑन द रेकॉर्ड का ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला जसं वाजवायचे तसं वाजवा माझं काही म्हणणं नाही माझं एवढंच म्हणणं आहे की जेव्हा समाजामध्ये सर्व काही आलबेल असावा ही अपेक्षा असते यापेक्षा तुम्ही पत्रकार म्हणूनही करता आणि सर्वसामान्य नागरिक म्हणूनही करता पण हे करत असताना जसं खासदार म्हणून माझी काही जबाबदारी आहे, तसेच पत्रकार म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. जर विरोधी पक्ष म्हणून खासदारांचा आवाज तुम्हाला सक्षम वाटत नसेल तर I'm sorry to say मीडिया म्हणून मलाही तुमचा आवाज सक्षम वाटत नाही असं म्हणत भाजप खासदार प्रीतम मुंडे बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकाराच्या प्रश्नावर मीडियावर भडकल्या.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivo V30e 5G भारतात लॉन्च; 50MP फ्रंट कॅमेऱ्यासह मोबाईलमध्ये आहेत अनोखे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Today's Marathi News Live : मंदा म्हात्रे यांनी थेट राजीनामा नाट्यावर केला मोठा खुलासा

Maharashtra Election: नाशिक लोकसभा मतदारसंघात अवघ्या २४ तासात नवा ट्वीस्ट; समता परिषदेने घेतली नवी भूमिका

Benifits of Guar: अनेकांना नापसंत असणारी गवार आरोग्यासाठी आहे फायदेशीर

Ratnagiri Sindhudurg : विनायक राऊतांनी नारायण राणेंचा भूतकाळ काढला; अनेक गोष्टी सांगून टाकल्या!

SCROLL FOR NEXT