सातारा satara dcc bank election result 2021 : गत काही वर्षांत आमदार शशिकांत शिंदे (shashikant shinde) यांच्या बगलबच्चे हे जावलीत गुंडागर्दी करीत हाेते. ही गुंडागर्दी समूळ उपटून काढण्यासाठी जावलीतील जनता जागृत झाली. त्यांनी जिल्हा बॅंक (dcc bank) निवडणुकीतून तालुक्यातील राजकारण वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा चंग बांधला गेला. त्यातून माझी उमेदवारी झाली. आज जावलीकरांमुळे मी जिंकलाे अशी आमदार शशिकांत शिंदे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी विजयानंतर आपली भावना व्यक्त केली. रांजणे म्हणाले त्यांनी अखेर पर्यंत दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. काेणाला एपीएमसीतून नाेकरीवरुन काढून टाकले. काेणाचे दुकान जाळू, घर जाळू अशा प्रकारे धमक्या दिल्या गेल्या. माेठ माेठी अमिष दाखवून देखील काही उपयाेग झाला नाही. जावलीची जनता आता सूज्ञ झालेली आहे त्यांना आता दहशतवाद, गुंडागर्दी मान्य नाही हे त्यांनी समजून घ्यावे असे रांजणे यांनी नमूद केले.
रांजणे म्हणाले माझ्याकडे विजयासाठी आवश्यक असणारी मत आहेत असं मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगून मला पॅनलमधून संधी मागितली. परंतु मला पॅनलमधून त्यांनी संधी दिली नाही. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी शेवटपर्यंत मी आमदार शशिकांत शिंदे यांनी पाठींबा द्यावा यासाठी प्रयत्न केला. परंतु ही निवडणुक माझ्या हातून सुटून मतदारांच्या हातात गेली हाेती. प्रत्येक मतदाराचा स्वाभिमान जागृत झाला हाेता.
गत काही वर्षांत आमदार शशिकांत शिंदे यांच्या बगलबच्चे हे जावलीत गुंडागर्दी करीत हाेते. ही गुंडागर्दी समूळ उपटून काढण्यासाठी जावलीतील जनता जागृत झाली. त्यांनी जिल्हा बॅंक निवडणुकीतून तालुक्यातील राजकारण वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा चंग बांधला गेला. त्यातून माझी उमेदवारी झाली. आज जावलीकरांमुळे मी जिंकलाे. त्यांनी अखेर पर्यंत दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. काेणाला एपीएमसीतून नाेकरीवरुन काढून टाकले. काेणाचे दुकान जाळू, घर जाळू अशा प्रकारे धमक्या दिल्या गेल्या. माेठ माेठी अमिष दाखवून देखील काही उपयाेग झाला नाही. जावलीची जनता आता सूज्ञ झालेली आहे त्यांना आता दहशतवाद, गुंडागर्दी मान्य नाही हे त्यांनी समजून घ्यावे असे रांजणे यांनी नमूद केले.
आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी पराभवानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचे समजले. खरंतर आमदार शशिकांत शिंदे हे बलाढ्य नेते आहेत. आम्हांला त्यांचा नितांत आदर आहे. एका छाेट्याशा निवडणुकीतील त्यांचा हाेणारा पराभव समर्थक पचवू शकले नाहीत. येणाऱ्या काळात आमदार शशिकांत शिंदे अथवा त्यांच्या सहका-यांनी जावळीत राजकीय क्षेत्रात काही गडबड केल्यास त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा देखील रांजणे यांनी दिला आहे.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.