crime news saam tv
महाराष्ट्र

Satara Crime News: जेलमध्येच पोलिसाला मारहाण; गुन्हा दाखल

या घटनेची चाैकशी तसेच अधिक तपास हवालदार दळवी हे करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : येथील जेलमध्ये एका बंदीवानाने पोलिसाला मारल्याची घटना घडली. त्यानंतर संबंधित पाेलिसाने याबाबत बंदीवाना विराेधात सातारा शहर पोलीस स्टेशनला शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रणजित गोपीचंद बर्गे हे जेलमध्ये कार्यरत आहेत. त्यांना बंदीवान काशीनाथ उर्फ काश्या सोनबा जाधव याने मारहाण करुन जिवंत मारण्याची धमकी दिली. त्यानूसार सातारा (satara) शहर पाेलिसांत (police) गुन्हा (crime) दाखल केला आहे. (satara latest marathi news)

या घटनेनंतर बर्गे यांनी जेलचे अधीक्षक डी. जी. दुबे यांच्याकडे तक्रार केली. दुबे यांनी जाधव यास बोलवले व चाैकशी करु लागले. परंतु जाधवने त्यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याचं पाेलिसांनी सांगितलं.

दरम्यान जाधव याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा तसेच अन्य कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची चाैकशी तसेच अधिक तपास हवालदार दळवी हे करीत आहेत. (crime news)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT