Valentine's Day दिवशी 'या' राज्यात सार्वजनिक सुटी जाहीर; जाणून घ्या कारण

गोवा विधानसभेची निवडणूक १४ फेब्रुवारीला होणार असून १० मार्चला मतमोजणी होणार आहे.
Rose
RoseSaam TV

गोवा : गोवा राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीचे (Goa Assembly Election) मतदान येत्या १४ फेब्रुवारीस हाेणार आहे. जास्ती जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी गाेवा राज्य सरकारने मतदाना दिवशी सार्वजनिक सुट्टी (public holiday) जाहीर केली आहे. आज (साेमवार) त्याबाबतचे निवेदन काढण्यात आलं आहे.

सामान्य प्रशासन विभागाचे सचिव श्रीपाद आर्लेकर यांनी काढलेल्या आदेशानुसार गोवा (goa) सरकारने सोमवार (ता. १४ फेब्रुवारी २०२२) गोवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत (goa election 2022) जास्ती जास्त मतदान व्हावे यासाठी सार्वजनिक सुट्टी (public holiday) म्हणून घोषित करण्यात येत आहे.

Rose
Africa Cup Of Nations: सॅडियो मानेची दमदार कामगिरी; आफ्रिका कप ऑफ नेशन्सवर सेनेगलची माेहर
Rose
Amit Shah On Owaisi Attack: धाेका लक्षात घेता ओवेसींनी Z Security स्विकारावी : अमित शहा

त्यानूसार गोव्यात मतदानाच्या दिवशी गोव्यात काम करणाऱ्या राज्यातील लोकांना सुट्टी दिली जाईल जेणेकरून ते त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकतील. गोवा विधानसभेची निवडणूक १४ फेब्रुवारीला होणार असून १० मार्चला मतमोजणी होणार आहे. दरम्यान याच दिवशी या व्हॅलेंटाईन डे (valentine day) आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदान करुन लोकशाहीबद्दल त्यांचे प्रेम व्यक्त करावे असे आवाहन निवडणुक विभागाने व्यक्त केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Rose
Nitesh Rane Case : नितेश राणेंची आजची रात्र रुग्णालयातच, जामीनावर उद्या सुनावणी | SAAM TV

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com