Chandrapur News Saam TV
महाराष्ट्र

Chandrapur News: सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट न लावल्याने मुख्याधापिका संतापल्या; २३ विद्यार्थिनींना केली भयंकर शिक्षा

Chandrapur School News: तासाभराने मुलींची सुटका झाल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काहींना उलट्या देखील झाल्या.

Ruchika Jadhav

Chandrapur:

चंद्रपूर शहरातील एका शाळेत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळकरी विद्यार्थिनींच्या एका चुकीमुळे त्यांना विचित्र शिक्षा दिली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी विद्यार्थिनींना तासभर बाथरूममध्ये डांबून ठेवलं होतं. बाथरूममध्ये अस्वच्छता असल्याने काही विद्यार्थिनींना याचा त्रास झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट न लावल्याने शिक्षा म्हणून मुख्याध्यापिकांनी २३ शाळकरी विद्यार्थिनींना अशी वागणूक दिली. तासाभराने मुलींची सुटका झाल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काहींना उलट्या देखील झाल्या.

इयत्ता ७ वी ते १० वीच्या एकूण २३ विद्यार्थिनींना शाळेच्या बाथरूममध्ये डांबण्यात आलं होतं. जेव्हा मुलींनी याची तक्रार शिक्षकांकडे केली, तेव्हा त्यांची मदत करण्याऐवजी खिल्ली उडविली गेली. त्रस्त मुलींनी पुढे त्यांच्या पालकांना घडलेल्या या प्रकाराची हकीकत सांगितली.

पालकांनी युवासेनेकडे ही माहिती दिली. नंतर युवासेना कार्यकर्ते आणि पालक घटनास्थळी पोचले आणि आंदोलन केले. त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे शाळेने आपली चूक मान्य देखील केली आहे. त्यानंतर मुख्याध्यापिकांनी शिक्षाम्हणून केलेल्या कृत्याची कबुली दिली. घटनेबाबत जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT