केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराडांवर पंतप्रधान मोदींची कौतुकाची थाप... Saam Tv
महाराष्ट्र

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराडांवर पंतप्रधान मोदींची कौतुकाची थाप...

विमानात चक्कर आलेल्या प्रवाशाला प्रथमोपचार देणारे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराडांचं सर्वत्र कौतुक होतंय, पीएम मोदींनीही त्यांना कौतुकाची थाप दिलीयं.

डॉ. माधव सावरगावे

मुंबई: केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Union Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad) हे सोमवारी विमानाने दिल्लीहून मुंबईकडे निघाल्यानंतर एक प्रवासी विमानातच चक्कर (Dizziness) येऊन खाला पडला. त्यानंतर विमानात आरडाओरडा सुरू झाली. त्यावेळी डॉ. भागवत कराड यांनी स्वतः तिथं जाऊन पाहणी केली. एक व्यक्ती खाली पडल्याचे पाहिल्यानंतर त्यांच्यातल्या डॉक्टर जागा झाला. विमानात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय साधनाच्या आधारे त्यांनी त्या व्यक्तीवर उपचार केले. त्यानंतर त्या व्यक्तीला बरे वाटले. डॉ. भागवत कराडांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Dr. Bhagwat Karad Viral Photo) झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक होत होते. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत डॉ. भागवत कराडांचं कौतुक केलंय. (Prime Minister Modi Praised Dr. Bhagwat Karad for his humanity)

हे देखील पहा -

इंडिगो एअरलाईन्सने (IndiGo AirLine) याबाबत ट्विट करत अगोदरच डॉ. भागवत कराडांचे कौतुक करत त्यांचे आभारही मानले होते. "आपले कर्तव्य अखंडपणे पार पाडल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि प्रामाणिक कौतुक! डॉ. भागवत कराड सहप्रवाशाला मदत करण्यासाठी तुमची कृती नेहमीच प्रेरणादायी असेल." अशा शब्दांत इंडिगो एअरलाईन्सने डॉ. कराडांची स्तुती केली. त्यानंतर याच ट्विटला (PM Modi's Tweet) रिट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "हृदयात डॉक्टर, नेहमीच!, माझे सहकारी डॉ. भागवत कराड यांची उत्तम कृती" असं ट्विट करत मोदींनी डॉ. भागवत कराड (Modi Praised Bhagwat Karad) यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

डॉ. भागवत कराड हे राजकारणात येण्यापूर्वी पूर्णवेळ डॉक्टर म्हणून कार्यरत होते. मराठवाड्यातील ते पहिले बालरोग शल्य चिकित्सक (The first pediatric surgeon in Marathwada) आहेत. अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी ते सर्व परिचित आहेत. शिवाय त्यांनी आपल्या डॉक्टरकीच्या करिअरमध्ये अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून रुग्णांना बरे केले आहे. मात्र, गेल्या वीस वर्षांपासून ते वैद्यकीय सेवेपासून दूर होत पूर्णवेळ राजकारणात आले. नगरसेवक, महापौर आणि भारतीय जनता पार्टीच्या (Bhagwat Karad BJP) राज्य कार्यकारणीमध्ये ते कार्यरत होते. गेल्या वर्षी खासदार आणि काही महिन्यात केंद्रीय राज्य मंत्री झाले. नेहमी गरजूंना मदत करणे, मितभाषी हा त्यांचा स्थायीभाव आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, स्लीप वाटण्यावरून वाद

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

SCROLL FOR NEXT