MPSC Exam
MPSC Exam  Saam Tv
महाराष्ट्र

SEBC प्रवर्गासाठी मोठी बातमी! सरळसेवा भरती आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार, परिपत्रक जारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

MPSC :

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग निर्माण करण्यात आला आहे. त्यानुसार या वर्गासाठी १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

या अधिनियमातंर्गत २०२४ च्या अंमलबजावणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर (Website) प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही अंमलबजावणी १६ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आली होती.

मराठा तरुण- तरुणींना १० टक्के शैक्षणिक व नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्यानुसार आता मराठा तरुणांना ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू झाली आहे

सदर अधिनियमान्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गासाठी राज्याच्या लोकसेवांमधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी १० टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी (Information) https://mpsc.gov.in वर लॉगिन करु शकता.

यामध्ये उच्च न्यायालायाच्या उपरोक्त आदेशाच्या अनुषंगाने सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे कळविण्यात येते की, संदर्भिय महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या आरक्षण अधिनियम २०२४ मधील तरतुदीनुसार आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिरातीच्या अधिन राहातील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Chiplun Heavy Rain : भर उन्हाळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; चिपळून, अडरे भागात नद्या झाल्या प्रवाहित

Perfect Apple : बाहेरून मस्त दिसणारा सफरचंद आतून खराब निघतो; वाचा गोड आणि टेस्टी Apple ओळखण्याच्या टिप्स

Tomato Side Effects: या लोकांनी टोमॅटो खाणे आरोग्यासाठी घातक

SCROLL FOR NEXT