दिल्ली : देशाच्या प्रजासत्ताक दिनी (republic day) देण्यात येणा-या राष्ट्रपती पदकांच्या (president medal award) यादीत मूळचे महाराष्ट्रातील नांदेड (nanded) जिल्ह्यातील सध्या झारखंड (jharkhand) येथे अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) पदावर कार्यरत असणारे संजय आनंदराव लाठकर (Sanjay Lathkar) यांच्या नावाचा समावेश झाला आहे. लाठकर यांना राष्ट्रपती पदक घाेषीत झाल्याने नांदेडकरांमध्ये (nanded) (citizens of nanded are celebrating sanjay lathkar president medal award news) चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
आपल्या २६ वर्षाच्या कारकिर्दित लाठकर यांनी महाराष्ट्रातील परभणी (parbhani), लातूर येथे एसपी म्हणून तसेच पुणे शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त व दहशतवाद विरोधी पथकाचे डीआयजी या महत्वाच्या पदांवर काम केलेले आहे (republic day).
सीआरपीएफमध्ये (crpf) लाठकर यांनी बिहार, झारखण्ड, महाराष्ट्र येथे उत्तम सेवा बजावली आहे. यापुर्वी त्यांना राज्य व केंद्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समवेत झालेली त्यांची भेट लाठकर यांच्यासाठी संसमरणीय ठरल्याचे त्यांनी एका मुलाखती दरम्यान नमूद केले हाेते.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.