भयंकर प्रकार! चुलत भावाच्या अत्याचारानंतर बहिण झाली गर्भवती Saam Tv
महाराष्ट्र

भयंकर प्रकार! चुलत भावाच्या अत्याचारानंतर बहिण झाली गर्भवती

बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अखेर या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : हि माझी पत्नी असून अद्याप आम्हाला बाळ नको, असे एका अल्पवयीन मुलीला घेऊन आलेल्या २३ वर्षीय युवकाने जिल्हा स्त्री रूग्णालयातील डॉक्टरांना सांगितले होते. तेथील डॉक्टरांना मुलगी अल्पवयीन असल्याचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चुलत बहीणीलाच आपल्या वासनेची शिकार करणाऱ्या २३ वर्षीय युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. अकोल्यातील बाळापूर पोलिसांच्या हद्दीतील गोरेगाव खुर्द या ठिकाणी बहीण- भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बाळापूर तालुक्यातील गोरेगाव खुर्द या ठिकाणी एक महिला आपल्या अल्पवयीन मुलीसोबत राहत होती.

हे देखील पहा-

या महिलेने आपला पुतण्या संतोष उर्फ प्रमोद ज्योतीसींग चव्हाण या २३ वर्षीय युवकाला कोणीच नसल्याने आपल्या घरात आश्रय दिला होता. सदर महिलेचा पती दारुड्या असल्याने ती एकटीच मोलमजुरी करुन चरितार्थ चालवत होती. ती मजुरीला बाहेर जात असल्याची संधी साधून या युवकाने लग्नाचे आमिष दाखवून आपल्याच चुलत बहिणीवर अत्याचार केला आहे. यातूनच ती गर्भवती राहिली.

यामुळे घाबरुन संतोषने त्या पीडितेला अकोला या ठिकाणी स्त्री रुग्णालयात गर्भपात करण्याच्या उद्देशाने घेऊन गेला. कोणाला संशय येऊ नये, म्हणून त्याने पती- पत्नी असल्याचा बनाव केला. मात्र, डॉक्टरांना संशय आल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. बाळापूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वाडेगाव पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक गजानन रहाटे यांनी तपास करून आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या दिग्गज नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या; घटनास्थळी सापडली सुसाइड नोट, चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Uddhav Thackeray: हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि परत मैदानात उतरा, फुटलेल्या खासदारांना उद्धव ठाकरेंचे थेट आव्हान

Maharashtra News Live Update: टीईटी पेपर फुटीची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे - जयंत आंसगावकर

SIP Calculator: फक्त महिना २०,००० रुपयांमध्ये होऊ शकता ₹१ कोटीचे मालक, ते कसं आणि किती वर्षांत?, जाणून घ्या

Shruti Marathe: नथ, नऊवारी आणि दिलखेचक अदा; श्रुती मराठेचा पारंपरिक सौंदर्यावर चाहते फिदा

SCROLL FOR NEXT