Sambhajiraje Chhatrapati SAAM TV
महाराष्ट्र

Rajya Sabha Election 2022: 'संभाजीराजेंचा 'यांना' गेम तर करायचा नाहीये ना?'

शरद पवारांनी पाठींबा देऊनही अन्य नेेत्यांची भुमिका संशयास्पद वाटत असल्याचे प्रवीण दरेकर यांनी नमूद केले.

विजय पाटील

सांगली : महागाई वाढल्याने केंद्राने पेट्रोल (petrol) आणि डिझेलच्या दर कमी केला. मात्र राज्य सरकारने मात्र राजा झाला उदार आणि हाथी भोपळा अशी गत करून ठेवली आहे असा टाेला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी महाविकास आघाडीला (mva) लगावला आहे. ते सांगली (sangli) येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. (parvin darekar latest marathi news)

दरेकर म्हणाले केंद्र सरकार आपल्या परीने करीत असते. राज्य सरकार केवळ बोट दाखवते आणि इतर राज्याने पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रित ठेवले पण राज्य सरकारने राजा उदार झाला आणि हाथी भोपळा दिला. एखादा रुपया कमी करून आम्ही पण काही करतोय असा केविलवाणा फुटकळ प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. केंद्राने केले तरी चांगले बोलायची सवय राज्य सरकारची (maharashtra government) नाही. त्यांची केवळ हवेत तीर मारण्याची सवय आहे असेही दरेकर यांनी नमूद केले.

दरेकर म्हणाले ब्रिजभूषण सिंह यानी ज्या पद्धतीने राज ठाकरे (raj thackeray) यांना विरोध केला. त्याला राष्ट्रवादी (ncp) कडून रसद पुरवली असावी अशी शक्यता आहे. राजकारणात दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार करण्याचे काम होत असते पण आमचा खांदा मजबूत आहे. आमचे राजकारण जनतेशी निगडित आहे असेही दरेकर यांनी नमूद केले.

महाविकास आघाडीवर संशय

राज्यसभेच्या उमेदवारीवरून देखील राजेंचा यांना गेम तर करायचा नाही ना? त्यांचा अवमान केला जातोय असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. शरद पवारांनी (sharad pawar) संभाजीराजे (yuvraj sambhajiraje chhatrapati) यांना आधीच पाठींबा दिला नंतर मात्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी वेगळी भूमिका सांगितली.

केंद्राकडून जीएसटीचा पैसा राहिला असा आरोप सतत महाविकास आघाडी करीत असून ताे याेग्य नसल्याचे दरेकर यांनी नमूद केले. ते म्हणाले महाराष्ट्रचा जीएसटीचा एकही पैसा देणेबाकी राहिलेला नाही. केवळ या वर्षाचे त्या ठिकाणी पैसे होते. त्यातील 50 टक्के रक्कम देण्यात आलेली आहे. आमच्या माहिती प्रमाणे तेरा हजार कोटी फक्त शिल्लक आहेत ते जुलैपर्यंत मिळतील. दरम्यान याबाबत अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी देखील विश्वास असल्याचा दावा दरेकर यांनी केला.

Edited By : Siddhath Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

SCROLL FOR NEXT