Pravara Sugar Factory Fire Saam Digital
महाराष्ट्र

Pravara Sugar Factory Fire : प्रवरा साखर कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Pravara Sugar Factory Fire News : अहमदनगर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. प्रवरा साखर कारखान्याच्या वीज निर्मिती प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. सतर्कता दाखवत कामगार बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Sandeep Gawade

अहमदनगर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. प्रवरा साखर कारखान्याच्या वीज निर्मिती प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. सतर्कता दाखवत कामगार बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या हा कारखाना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली आहे.

कारखान्यात वीज निर्मितीचा हा प्रकल्प गॅमन इंडीया या खासगी कंपनीचा आहे. भर ऊन्हात आग लागल्याने आगीने रौद्ररुप धारण केलं होतं. सुदैवाने कामगार बाहेर पडल्याने अनर्थ टळला. जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आगीमुळे कारखान्यातील सर्व कामकाज बंद करण्यात आलं आहे.

नाशिकमध्ये ST बसला अचानक आग

नाशिकमध्ये पुन्हा एकदा बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावर ही घटना घडली. बसला अचानक आग लागल्यानंतर बसमधील प्रवासी खाली उतरले. सर्व प्रवासी बसमधून खाली उतरल्यानंतर या बसची आग वाढली. या घटनेने रस्त्यावर एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवी मुंबईत सुसाट प्रवास, मुंबई-पुणे महामार्ग फक्त १० मिनिटांत; २,९०० कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील, कसा असेल ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे?

Maharashtra Farmer : पैसे द्या नाहीतर मेलेली म्हैस घ्या! शेतकऱ्याचा संताप उफाळला, मृत म्हशीसह बँकेसमोर आंदोलन

Relationship Issues: पत्नी असूनही पुरुष परक्या स्त्रीच्या प्रेमात का पडतात? वाचा पुरुषांच्या मनातील रहस्य

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

Mumbai To Kedarnath Travel: मुंबईहून केदारनाथ यात्रेचा प्रवास कसा कराल? प्रवास मार्ग, ट्रॅव्हल टिप्स जाणून घ्या

SCROLL FOR NEXT