prathiba thackeray save life of python saam tv
महाराष्ट्र

Python Rescued : प्रतिभा ठाकरेंनी पकडला आठ फुटांचा अजगर, वाचा थरारक घटना

Python Rescued From Farm : ग्रामस्थांनी ठाकरेंचे मानले आभार

Siddharth Latkar

- हर्षदा सोनोने

Akola News : अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यात सर्पमैत्रिण प्रतिभा ठाकरे यांनी आठ फूट अजगराला जीवनदान दिले आहे. दरम्यान ठाकरे यांच्या धाडसाचे केवळ तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण अकाेला जिल्ह्यात काैतुक हाेत आहे. (Maharashtra News)

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या सोनगीरी शेत शिवारात एक आठ फूटाचा अजगर आढळून आला. यावेळी महिलांनी त्याबाबतची माहिती काही गावक-यांना दिली. शेतात भला माेठा अजगर असल्याची वार्ता गावात पसरली. यामुळे गावकरी भयभीत झाले.

सोनगीरी येथील पांडुरंग खेडकर यांचे शेत शिवारात अजगर आढळल्याची माहिती खेडकर यांच्या पत्नीने दिला. त्या शेतात गवत कापण्याचे काम करीत हाेत्या. अचानक भलामोठा अजगर त्यांना दिसला. अजगराला पाहताच त्यांची भितीने गाळण उडाली.

त्यांनी लगेच बाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना ही घटना सांगितली. शेतक-यांनी पारस येथील वन्यजीव संस्था सदस्या तथा सर्पमैत्रिण प्रतिभा ठाकरे यांना फाेन करून अजगर असल्याची माहिती दिली.

ठाकरे यांनी वेळ न दवडता घटनास्थळ गाठले. मोठ्या शिताफीने व धाडसाने त्यांनी अजगराला पकडले. साधारणत: आठ फूटाचा अजगराला ठाकरे यांनी पातूरच्या जंगलात सोडून दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT