Prataprao Jadhav
Prataprao Jadhav Saam TV
महाराष्ट्र

शिवसेना खासदाराच्या हॉटेलवर 20 वर्षापासून दिली जाते हनुमान चालीसा भेट!

संजय जाधव

बुलडाणा: प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचा प्रसार व प्रचार त्याचबरोबर पूजा-अर्चा करण्याचे स्वातंत्र्य भारतीय घटनेने आपल्याला बहाल केले आहे. मात्र तो धर्म इतरांवर लादणे, किंवा त्यासंदर्भात राजकारण करणे हे कितपत योग्य आहे, याचा विचार करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून मज्जिदवरील भोंगे आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) यासंदर्भात राज्यभर रणकंदन माजले आहे. मात्र धर्म हा दाखवण्याचा किंवा दुसऱ्यावर लादण्याचा विषय नसून तो एक आस्थेचा विषय आहे, आणि म्हणूनच गेल्या वीस वर्षापासून कुठलाही गवगवा न करता बुलडाण्यातील शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या हॉटेलवर ग्राहकांना मोफत हनुमान चालीसा पुस्तिका भेट दिली जात आहे.

बुलडाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांची मेहकर येथे परिवार नावाची हॉटेल आहे, या हॉटेल ची स्थापना सुमारे वीस वर्षांपूर्वी करण्यात आली आणि तेव्हापासूनच या हॉटेलवर येणाऱ्या ग्राहकांना मोफत हनुमान चालीसा पुस्तिका देण्यात येत आहे.

विविध ठिकाणावरून चहा, नाश्ता आणि जेवणासाठी येत असलेल्या प्रत्येक ग्राहकाला स्वच्छेने हे हनुमान चालीसा पुस्तिका मोफत भेट दिली जाते. दिवसाकाठी अडीचशे ते तीनशेच्या जवळपास या पुस्तिका वितरित केल्या जात आहेत, आणि हे अविरतपणे गेल्या वीस वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे हिंदुत्व हे मिरवण्याची गोष्ट नसून ते आम्ही आकलनात आणत असल्याचे त्या हॉटेलचे भागीदार सांगतात.

हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा ही श्रीराम आणि मारुती वर आहे, मात्र त्याचा राजकारणासाठी वापर करण्यात येऊ नये, या हॉटेलवर गेल्या 15 ते 20 वर्षांपासून हनुमान चालीसा कुठलाही गाजावाजा न करता मोफत दिले जाते, हे खऱ्या अर्थाने प्रशंसनीय आहे, अशी प्रतिक्रिया पुणे येथील एका महिला ग्राहकाने दिली आहे, जी या हॉटेलची नियमित ग्राहक आहे.

तर आम्ही हॉटेलचे नियमित ग्राहक असून अनेक वर्षापासून हॉटेलवर धर्माच्या बाबतीत हा उपक्रम सुरू आहे, त्यामुळे इतर राजकीय नेत्यांनी देखील धार्मिक राजकारण करू नये, उलट असे विविध उपक्रम राबवून आपल्या धर्माची जनजागृती देखील करता येते, असा सल्ला परिसरातील एका सरपंचाने दिलाय.

खरं तर कुणी कुठल्या धर्माचे अनुकरण करावे, हा ज्याचा त्याचा घटनात्मक अधिकार आहे, मात्र आपल्या धर्माचे राजकारण न करता, धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी सामाजिक उपक्रम राबविल्यास उत्तम ठरेल, एक प्रकारे धर्माचे राजकारण करणाऱ्यांना हा धार्मिक उपक्रम म्हणजे, एक प्रकारे चपराक च म्हणावी लागेल.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : निलेश लंके, सुजय विखे पाटील यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

SCROLL FOR NEXT