prashant bhosale saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : ऊस तोडणी मजुरांकडून बेंबळेतील वाहन मालकाचा मध्य प्रदेशात खून

या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

भारत नागणे

Pandharpur News : ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांनी पैशाच्या लालसे पोटी माढा तालुक्यातील बेंबळे गावातील एका वाहन मालकाचा बेदम मारहाण करून खून केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रशांत महादेव भोसले (अण्णासाहेब) असे या खून झालेल्या वाहन मालकाचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सरहद्दीवर रविवारी घडली आहे. (Pandharpur Latest Marathi News)

अण्णासाहेब हे ऊस तोडणीचे मजूर आणण्यासाठी आपल्या इतर सहकाऱ्यांसमवेत मध्य प्रदेशातील एका आदिवासी गावात गेले होते. मजुरांना एका टेम्पोमध्ये बसून ते घेऊन येत असताना रस्त्यामध्ये ऊस तोडणी मजुरांनी अण्णासाहेब यांना लोखंडी व लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून त्यांचा खून केला त्यानंतर त्यांना रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले.

अण्णासाहेब भोसले हे रविवारी मजुरांची टोळी एका टेम्पोमध्ये भरून बेंबळेकडे येण्यास निघाले. परंतु याचवेळी टेम्पोतील मजुर व मुकदम यांनी प्रशांत भोसले यांना 'अण्णा तुम्ही आमच्या टेम्पोतच बरोबर बसा 'असा आग्रह केला. भोसले यांना वाटले की प्रवास दूरचा आहे तेव्हा या मजुरांना चहापाणी नाश्ता जेवण पाहिजे असेल म्हणून त्यांनी टेम्पोत बसण्याचा आग्रह केला असावा असे त्यांनी आपले भाचे प्रमोद रेडे यांना सांगितले होते.

काही काळ स्कार्पिओ पाठीमागे व मजुरांने भरलेला टेम्पो पुढे असा प्रवास सुरू होता. यावेळी भोसले यांचे जवळ किमान दोन ते सव्वा दोन लाख रुपये होते. हे पैसे टोळीच्या मुकादमाला व मजुरांना माहीती होते. थोड्याच वेळात टेम्पो पाठीमागून येईल या उद्देशाने स्कार्पिओ मधून प्रमोद रेडे भाचा व इतर दोघे यांनी आपली गाडी पुढे घेतली व ते पाठीमागून मामा टेंम्पोमधून येतील म्हणून ते मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सरहद्दीच्या पुढे आले. दरम्यान स्कॉर्पिओ गाडी पुढे गेल्याचे पाहून मजूरांनी टेम्पो बाजूला घालून टेम्पोतच भोसले यांना बेदम मारहाण केली व त्यानंतर त्याना रस्त्याच्या कडेला फेकून दिले. (Maharashtra News)

पुढे गेलेल्या स्कॉर्पिओ मधील प्रमोद रेडे यांनी टेम्पोला उशीर का होत असावा अशी शंका आल्यामुळे त्यांनी भोसले यांना फोन केला असता त्यांचा मोबाईल लागत नव्हता, बरेच वेळा प्रयत्न करूनही फोन लागत नसल्याचे त्यांना शंका आली. त्यांनी आपली गाडी माघारी फिरवून घेतली थोड्याच अंतरावर त्यांना आण्णासाहेब भोसले हे अस्ताव्यस्त अवस्थेत रस्त्यावर पडल्याचे दिसून आले. तातडीने त्यांनी महाराष्ट्र हद्दीतील श्रीरामपूर या गावी हॉस्पिटलमध्ये (hospital) भोसले यांना दाखल केले. परंतु त्यांचा मृत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये उन्हाचा चटका वाढताच रस्त्यावर शुकशुकाट

BJP: माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव, तेव्हाच पद मिळेल; महिला पदाधिकाऱ्याचा भाजप नेत्यावर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरायला गेली, वाटेत दोघांनी अडवलं; जंगलात नेऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार

Auto Driver Marathi language : हिंदीसक्तीचा बदला घेण्यासाठी शिंदेसेनेची मराठीसक्ती? EXPLAINER

Glowing Skin Tips: किचनमध्येच लपलंय आपल्या सौंदर्याचं गुपित; हा एक पदार्थ लावा, चेहरा चमकेल पाऱ्यासारखा

SCROLL FOR NEXT