Social Media : चर्चा तर हाेणारच ! युवकांनी चक्क गावच काढलं विकायला; सोशल मिडियावरही झळकताहेत पोस्टर्स

प्रशासन आता तरी जागे हाेईल का अशी देखील चर्चा रंगली आहे.
gharatwadi , social media, solapur, karmala
gharatwadi , social media, solapur, karmalasaam tv
Published On

Social Media : देशाला 75 वर्ष होऊन गेले तरी अद्याप गावाला डांबरी रस्ता केला जात नाही. त्यामुळे निराश झालेल्या ग्रामस्थांनी चक्क गावच विकायला काढलं आहे. गावात ठिक ठिकाणी गाव विकायचे आहे असे लागलेल्या फ्लेक्स आता साेशल मीडियावर (Social Media) झळकू लागले आहेत. त्यामुळे राज्यभरात साेलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा (Karmala) तालुक्यातील घरतवाडी या गावाचाी चर्चा हाेऊ लागली. (Gharatwadi Latest Marathi News)

घरतवाडी विकणे आहे ? शासकीय यंत्रणेवर बहिष्कार अशा विविध प्रकारचे पोस्टर्स तयार करून घरतवाडी (ता.करमाळा) येथील युवकांनी एकत्र येऊन शासकीय यंत्रणेवर बहिष्कार टाकण्याचा ठरवले. विविध गैरसोयीबाबतीत पोस्टर तयार करून या युवकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. या पोस्टरमध्ये “घरतवाडी विकणे आहे”, “शासकीय यंत्रणेवर बहिष्कार”, भारत स्वतंत्र होवून ७५ वर्षे पूर्ण झाली तरी, घरतवाडी गावाला डांबरी रोड नाही..!” “कधी मिळणार आमच्या हक्काचा डांबरी रस्ता”, “निष्क्रिय शासन यंत्रणा आणि ढिम्म प्रतिनिधी” “आमच्या हक्काचा रस्ता मिळालाच पाहिजे..!” (Maharashtra News)

gharatwadi , social media, solapur, karmala
Radhakrishna Vikhe Patil : विखे पाटलांच्या दाै-यानंतर पंचनाम्यासाठी शेतक-यांना मागितले एकरी चारशे रुपये

पांढरपेशा लोकप्रतिनिधींकडून होतोय जाणीवपूर्वक आमच्यावर अन्याय” अशा प्रकारची विविध डिजिटल पोस्टर तयार करून सोशल मीडियावर (social media) या युवकांनी प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे हे गाव चांगलेच चर्चेत आले आहे.

gharatwadi , social media, solapur, karmala
Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर अपघात; महिला मृत्यूमुखी, चार जखमी, एक गंभीर

घरतवाडी हे गाव करमाळा (karmala) तालुक्यातील शेवटच्या टोकाला असल्याने या गावावर वारंवार अन्याय झालेला आहे, असे या युवकांचे म्हणणे आहे. या गावाला भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा डांबरी रस्ता नाहीये त्यामुळे येथील नागरिकांची वाटचाल अत्यंत खडतर प्रवासातून होत आहे.

gharatwadi villagers
gharatwadi villagerssaam tv

या भागातील वृद्ध नागरिक, शाळकरी विद्यार्थी, दुचाकी, चारचाकी वाहनचालक यांना या वाहतुकीचा प्रचंड मोठा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या गावातील तरुणांनी एकत्र येऊन शासकीय यंत्रणेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे, किमान हे पोस्टर प्रदर्शित करून तरी शासनाला जाग आली तर या गावाला डांबरी रस्ता मिळेल व इतर सुविधा उपलब्ध होतील, विविध डिजिटल पोस्टर तयार करून सोशल मीडियावर या युवकांनी प्रसिद्ध केल्याने घरतवाडी हे गाव चांगलेच चर्चेत आले आहे. (Breaking Marathi News)

gharatwadi , social media, solapur, karmala
Radhakrishna Vikhe Patil : विखे पाटलांच्या दाै-यानंतर पंचनाम्यासाठी शेतक-यांना मागितले एकरी चारशे रुपये

अनेक दशकांपासून लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊन व अनेकदा पाठपुरावा करूनही गावाला डांबरी रस्ता मिळाला नाही. कुंभारगाव- घरतवाडी रस्त्याची झालेली दयनीय अवस्थेमुळे आम्ही गाव विकणे आहे असे पोस्टर बनवून प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा निषेध केल्याचे काही युवकांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com