vitthal temple file photo  saam tv
महाराष्ट्र

श्री विठ्ठलाचे दर्शन आजपासून २४ तास बंद; 'हे' आहे कारण

आषाढी वारीच्या काळात भाविकांना अखंड दर्शन देऊन थकलेल्या विठूरायाची आज प्रक्षाळ पूजा संपन्न झाली.

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) काळात भाविकांना अखंड दर्शन देऊन थकलेल्या विठूरायाची आज प्रक्षाळ पूजा संपन्न झाली. आज पासून २४ तास दर्शन बंद झाले असून विठुरायाच्या राजोपाचारास सुरुवात झाली. १८ दिवसानंतर आज थकलेल्या विठूरायाला निद्रा मिळाली आहे. (Pandharpur Vitthal Temple News In Marathi)

आषाढी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना गेले १८ दिवस २४ तास दर्शन देवून थकलेल्या विठूरायाची आज प्रक्षाळ पूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते झाली. आज दुपारी १२ नंतर देवाला गरम पाण्याने अभ्यंग स्नान घालण्यात आले . याचवेळी संपूर्ण मंदिरही धुवून घेण्यात आले. यापूर्वी देवाचा शिणवटा घालविण्यासाठी पायाला पिठीसाखर लिंबू लावतात.

दुपारी नंतर देवाला दुध दही सह सुगंधी केशर पाण्याने श्री विठ्ठलाला वेद मंत्रांसह पवमान अभिषेक करण्यात आला . यांनतर देवाला सुंदर पोशाख केला मौल्यवान पारंपरिक दागिने परिधान करण्यात आले होते. थकवा जाण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पतींचा काढा दाखवला जातो.

या प्रक्षाळ पुजेची परंपरा शेकडो वर्षापासून सुरु असून आजचा दिवस पंढरपुरातील (Pandharpur) घराघरात साजरा केला जातो. आज देवाला पुरणपोळी सह पंचपक्वानाचा महानेवैद्य दाखविण्यात येतो .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT