Prakash Ambedkar Saam TV
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी डाव टाकला, नव्या भूमिकेने महाविकास आघाडी आणि महायुतीचं टेन्शन वाढणार?

Vishal Gangurde

पराग ढोबळे, नागपूर

Prakash Ambedkar News :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने नवी भूमिका मांडली आहे. 'आमची संकल्पना महाविकास आघाडीला मान्य झाली नाही. त्यांचं भांडणही मिटलं नाही. यामुळे या निवडणुकीत आम्ही आघाडी म्हणून उभं राहत आहोत. राज्यातील अनेक मतदारसंघात आम्ही निवडणूक लढवणार, हे जाहीर करत आहोत, असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज नागूपर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'अनेक ठिकाणी महाविकास आघाडीत समझोता नाही हे आम्ही सांगतो होतो. ते आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे यादी जाहीर होत नाही. या तिन्ही पक्षांच्या वेगळवेगळ्या याद्या बाहेर पडताना दिसत आहेत. ते मैत्रीपूर्ण अशा पद्धतीची संकल्पना मांडत आहेत. आम्हाला हे अगोदर माहीत होतं. यामुळे आम्ही त्यांना पहिलं तुम्हीच वाद मिटवा म्हटलं'.

'महाविकास आघाडीचं भांडण मिटत नसल्यामुळे ते आम्हाला कोणत्या जागा लढायला पाहिजे, ते सांगत नाही. आम्ही महाविकास आघाडीत गेलो असतो तर अजून बिघाड झाला असता. आम्ही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून पाठिंबा देत असल्याचा त्यांना सांगितलं, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

'लोकसभा निवडणुकीत एकाच विचारांची माणसं आणि संघटना एकमेकांच्या विरोधात लढत आहे. 14 ते 16 मतदारसंघांमध्ये अशी परिस्थिती आहे. ज्या ठिकाणी मागील काळात पक्ष लढलेले आहे. त्यांचं त्याच ठिकाणी अस्तित्व आहे. जिथे लढलेली नाही, तिथे त्यांचं अस्तित्व नाही. शिवसेना आणि भाजपमधून दिसले आहे. भाजपला एवढ्या मोठ्या प्रमाणात दुसऱ्या लोकांना घेण्याची गरज काय, खरंतर त्यांची सुद्धा तशीच परिस्थिती आहे, असेही पुढे त्यांनी सांगितलं.

'भाजप ज्या मतदारसंघात लढलेला आहे, तिथे त्यांचं प्राबल्य आहे. मात्र, जिथे भाजप लढलेले नाही. तिथे त्यांचा प्राबल्य नाही. ते प्राबल्य आपल्याला मिळावं म्हणून काही पक्ष फोडण्याचा काम झालं. मनसेला सुद्धा भाजप स्वतःच्या पक्षांमध्ये सोबत घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे, असे आंबेडकरांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT