जळगाव : 'दिल्लीत शेतकरी उपोषणासाठी बसले होते. तेव्हा मोदी हे घरामध्ये विंग वाजवत बसले होते. त्यावेळी संघाच्या कार्यकर्त्यांना विचारलं, तुम्ही मानवतावाद सांगताय. हा कोणता मानवतावाद आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना भेटायला तयार नाही, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.रावेरमध्ये ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर आज शुक्रवारी जळगावच्या रावेर लोकसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांच्या प्रचारसभेला आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांवर टीका केली. तसेच यावेळी राजकारणातील नितीमत्तेवरही भाष्य केलं.
'ज्यांना नितीमत्ता नाही, ते कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात. त्यामुळे अशा माणसांपासून सावध राहिले पाहिजे. ते खासदार होत नाहीत. तर पूर्ण राज्य त्यांच्या हातात देतो. त्यानंतर आपली मानगुटी त्यांच्या हातात देत असतो. राज्यातील शेतकरी नेते मूग गिळून गप्प बसले आहेत. शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा नेता कधीच मिळाला नाही. शेतकरी नेते उभे झाले आहे, ते शेतीमधील पिकांवर ज्या प्रक्रिया होतात, त्या कारखान्यांचे मालक आहेत. ते शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
'राष्ट्रवादीनं २०१४ मध्ये भाजपला न मागता पाठिंबा दिला होता. निवडणूक होऊ नये म्हणून पाठिंबा दिल्याचे ते सांगतात. खरंतर निवडणूक ही व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. मग त्यांनी चौकशी होऊ नये म्हणून पाठिंबा दिला होता का नाही, याचा त्यांनी खुलासा करावा, असे आव्हान आंबेडकरांनी दिले. राजकीय लोकशाही आणि राजकीय सार्वभौमत्वाला टिकवायचं असेल, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, आर्थिक कणा असल्याशिवाय लोकशाही आणि राजकीय सार्वभौमत्व टिकत नाही, या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाची आठवण प्रकाश आंबेडकरांनी या वेळी करून दिली.
'भाजपनं राजीव गांधींना बदनाम केलं, त्यामुळे आता त्यांचे कपडे फाडण्याची वेळ आली आहे. भारतीय जनता पक्षाला उघडे पाडण्याची आली असून ती संधी काँग्रेस घालवत आहे, असेही ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.