Breaking प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा ( पहा व्हिडिओ ) Saam Tv
महाराष्ट्र

Prakash Ambedkar: मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमंक काय घडलं, शिंदे गटासोबत युती होणार का? प्रकाश आंबेडकरांनी केली मोठी घोषणा

स्वतः प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एकनाथ शिंदेंच्या भेटीबाबत खुलासा केला आहे. ज्यामध्ये त्यांनी नेमकं या भेटीत काय झालं याबद्दलही खुलासा केला आहे.

Gangappa Pujari

Prakash Ambedkar News: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर शिंदे गटासोबत युती करणार, अशाही बातम्या राजकीय वर्तुळात सुरू होत्या.

आता स्वतः प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एकनाथ शिंदेंच्या भेटीबाबत खुलासा केला आहे. ज्यामध्ये त्यांनी नेमकं या भेटीत काय झालं याबद्दलही खुलासा केला आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी महत्वाचा खुलासा केला आहे. यावेळी ते म्हणाले की, जे पक्ष भाजपासोबत युतीत आहेत अशा कोणत्याही पक्षाशी आम्ही युती करणार नाही, आमची आणि शिवसेना पक्षाची युती होणार आहे. याबद्दल मी एकनाथ शिंदेंनाही सांगितले आहे.

त्याचबरोबर याबद्दल पुढे बोलताना ते म्हणाले की, या भेटीत बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली, नाही असे नाही. मात्र भाजपासोबत असणाऱ्या पक्षासोबत आम्ही जाणार नाही. याबद्दल कोणत्याही परिस्थितीत समझौता होणार नाही, आम्ही शिवसेनेसोबत युती करणार आहोत. त्याचबरोबर शिंदेनी भाजपा सोडली तर पुढचा विषय होऊ शकतो, असेही वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

दरम्यान, काल मध्यरात्री प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदेची( Eknath Shinde) भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. यावर खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीच खुलासा केल्याने या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात वेतन रखडल्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

ITR Filing 2026 : पगार १२.७५ लाखांपर्यंत असला तरीही भरावे लागेल टॅक्स, काय त्यामागचं नेमकं कारण?

Wi-Fi Tips : Wi-Fi चा स्पीड वाढवायचा आहे? ८ सोप्या ट्रिक्सने इंटरनेट होईल सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT