Prakash Ambedkar News Saam Tv
महाराष्ट्र

Prakash Ambedkar: भाजपमध्ये नितीन गडकरींना हटवण्याचा कट; प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा

Prakash Ambedkar On Nitin Gadkari: अकोल्यात बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा खळबळजनक दावा केला आहे. भाजपातल्या काही लोकांना नितीन गडकरींची अडचण आहे. त्यामुळे त्यांना अडकवण्याचा कट रचत असल्याचं आंबेडकरांनी म्हटलं आहे.

Rohini Gudaghe

Prakash Ambedkar Big Claimed

प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) भाजपाच्या पक्षांतर्गत सत्तासंघर्षावर एक मोठं विधान केलंय. भाजपातल्या काही लोकांना नितीन गडकरींची अडचण होत आहे. त्यामुळे ते त्यांना बाजूला करण्याचा घाट घालत आहेत. मात्र, गडकरी बाजूला व्हायला तयार नसल्याने त्यांना अडकवण्याचा कट भाजपाचे (BJP) काही लोक रचत असल्याचा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. (Latest Politics News)

यासाठी नागपुरातील काही अधिकाऱ्यांना पकडत त्यांच्याकडून गडकरींनी लाच मागितल्याचं वदवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar On Nitin Gadkari) केलाय. ते काल रात्री अकोल्यात मुस्लिम समाजाच्या एका बैठकीत बोलत होते.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा निवडणुकीचे वारे

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यात राज्यात प्रकाश आंबेडकर यांच्या सभांचा धडाका सुरूच आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची कॉर्नर सभा पार (Prakash Ambedkar Big Claimed) पडली. या सभेत मुस्लिम समाजाशी संवाद साधताना आंबेडकर म्हटलंय की, यंदा मुस्लिम म्हणूनच तुम्हाला वोटिंग करावी लागणार आहे.

गडचिरोली आणि भंडारा वगळता प्रत्येक लोकसभेमध्ये मुस्लिम 'दीड लाख' आहे. त्यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे या निवडणुकीत मुस्लिमांनी मुस्लिम म्हणूनच मतदान केलं तर त्यांना निवडणुका जिंकता येतील, असं वक्तव्य त्यांनी अकोल्यातील आयोजित मुस्लिम समाज संवाद मेळाव्यात केलं (Prakash Ambedkar Sabha In Akola) आहे.

महाविकास आघाडीत जागेंचा तिढा

रवींद्र वायकर यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहायचा खूप प्रयत्न केला. मात्र, जेव्हा पलीकडून फास आवळला गेला, तेव्हा त्यांना पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. ते शिंदे गटात (Maharashtra Politics) गेले. महाविकास आघाडीत पंधरा जागांवर तिन्ही पक्षांची भांडणं आहेत. 14 तारखेपर्यंत त्यांची भांडण सुटली तरच आमच्याशी वाटाघाटी होऊ शकेल, असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.

महाविकास आघाडीच्या आपसातील जागा वाटपाच्या शक्यतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित (Lok Sabha Election) केलंय. दरम्यान, आपण हारलो किंवा जिंकलो तरी आपणच सिकंदर ठरणार असल्याचं सांगत आंबेडकरांनी त्यांच्या भूमिकेविषयी आणखी संदिग्धता वाढवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT