Maharashtra Politics : मराठा समाजापोठापाठ धनगर समाजही लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार, नेमकी काय रणनीती ठरली?

Maharashtra Political News : मराठा समाजाच्या भूमिकेनंतर धनगर समाजही लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Dhangar Reservation
Dhangar ReservationSaam TV
Published On

Maharashtra Political News :

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. मात्र, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारच्या आरक्षणाला विरोध केला आहे. ओबीसी वर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजाकडून आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्योक गावातून उमेदवार उभे केले जाणार आहेत. मराठा समाजाच्या भूमिकेनंतर धनगर समाजही लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील मराठा समाजाने सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करुन मराठा समाजाला ओबीसी वर्गातूनच आरक्षण द्यावं, या भूमिकेवर ठाम राहत सरकारच्या 10 टक्के आरक्षणाला नकार दिला आहे.

मराठा समाजाच्या मागणीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणानंतर संवाद दौऱ्याचं हत्यार हातात घेऊन लोकसभा निवडणुकीत मराठा समाज प्रत्येक गावातून दोन उमेदवार देणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर मराठा समाजाच्या या गनिमी काव्यासमोर निवडणूक यंत्रणा पुरे पडणार का? मतपत्रिकेवर मतदान घ्यावे लागणार का? मराठा समाजामुळे निवडणूक यंत्रणा कोलमडेल पडेल का? मराठा समाजाचा हा गनिमी कावा आता कुणाला भोवणार? असा प्रश्न उपस्थित आहे. याचदरम्यान, आता धनगर समाजानेही साजेशी भूमिका घेतली आहे.

Dhangar Reservation
Lok Sabha Election 2024 : आमचंही ठरलं ! लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे राहणार, मानवतमध्ये मराठा समाजाचा निर्धार

धनगर समाजाच्या वतीनेही प्रत्येक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जालन्यात धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांनी ही घोषणा केली आहे. भाजपविरुद्ध थेट धनगर समाजाने महाविकास आघाडीला उमेदवारी मागितली आहे.

दीपक बो-हाडे म्हणाले, मागच्या अनेक वर्षांपासून धनगर समाज घटनात्मक आरक्षणाची मागणी करतोय. मात्र सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांनी धनगर समाजाची दुहेरी फसवणूक केली आहे. आजच्या तीन कोटी धनगर समाज असताना मात्र त्यातील एकही धनगर संसदेत खासदार नाही. आता राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार आहे. तर स्वतः हा भाजपच्या रावसाहेब दानवे विरुद्ध धनगर समाजाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरणार असल्याचीही घोषणा केली.

Dhangar Reservation
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरे गटात प्रवशे करणार; या मतदारसंघातून उमेदवारी निश्चित?

जालन्यातून धनगर समाजाच्या वतीने निवडणूक लढण्याची घोषणा करण्यात आल्याने एल्गार सभेच्या माध्यमातून छगन भुजबळ यांच्या सोबत असलेल्या धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून वेगळा निर्णय घेतला. भुजबळ यांचे नेतृत्व तयार झालेल्या ओबीसी एल्गार सभेत फूट पडली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दीपक दीपक बोऱ्हाडे यांनी महाविकास आघाडीकडे धनगर समाजाला पाच जागेची मागणी केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com