Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का; बडा नेता पुन्हा शरद पवारांकडे परतला!

Nilesh Lanke News: लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार आहे.
Sharad Pawar vs Ajit Pawar NCP
Sharad Pawar vs Ajit Pawar NCP Saam TV
Published On

Nilesh Lanke Latest News

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. लंके सध्या पवारांच्या भेटीला पोहचले असून आज ते पक्षात प्रवेश करणार, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar vs Ajit Pawar NCP
Mahayuti Seat Sharing: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा दिल्लीत सुटणार? शिंदे-पवारांची आज अमित शहांसोबत बैठक

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. यापार्श्वभूमीवर इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून मतदारसंघावर आपला दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. अशातच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आमदार निलेश लंके निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

अहमदनगरमध्ये सध्या निलेश लंके यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स लागले असून यावर लंके यांचा दमदार आमदार-फिक्स खासदार, असा उल्लेख करण्यात आला आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील निवडून आले होते. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची देखील मोठी ताकद आहे. (Latest Marathi News)

त्यामुळे शरद पवार गटाने या जागेवर उमेदवार देण्यास तयारी दर्शवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निलेश लंके यांना अजित पवार गटाकडून लोकसभेची उमेदवारी हवी होती. मात्र, महायुतीत ही जागा भाजपच्या वाटेला जात असल्याने निलेश लंके नाराज झाले. त्यामुळेच त्यांनी शरद पवार गटात परतण्याचा निर्णय घेतलाय.

दरम्यान, निलेश लंके पुन्हा पक्षात परतल्याने अहमदनगरमध्ये शरद पवार गटाची ताकद वाढली आहे. त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विरुद्ध भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे, आमदार रोहित पवार यांनी देखील या मतदारसंघात आमचा उमेदवार कोण असेल याची गोड बातमी देऊ, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं.

Sharad Pawar vs Ajit Pawar NCP
Election Commissioner Resigns: निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याचे गूढ काय? ठाकरे गटाचा भाजपला थेट सवाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com