Mahayuti Seat Sharing: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा दिल्लीत सुटणार? शिंदे-पवारांची आज अमित शहांसोबत बैठक

Mahayuti Seat Sharing Formula: महायुतीचा जागावाटपाचा तिढा लवकरच सुटण्यासाठी शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आज पुन्हा दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे.
Mahayuti Seat Sharing Formula
Mahayuti Seat Sharing FormulaSaam Tv
Published On

Maharashtra Political News

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीचा जागावाटपाचा तिढा लवकरच सुटण्यासाठी शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आज पुन्हा दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. या भेटीत जागावाटप निश्चित होणार, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahayuti Seat Sharing Formula
Breaking News: PM मोदींच्या हस्तक्षेपामुळे रशिया-युक्रेनमधील अणुयुद्ध टळलं; अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावा

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. सर्वाधिक जागा निवडून याव्यात यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार रणनिती आखण्यात येत आहे. कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी देण्यात यावी, यावर सध्या खलबंत सुरू आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचाही जागावाटपाचा तिढा पुढच्या ४८ तासात मिटण्याची चिन्हं आहेत. महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तेब करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सोमवारी पुन्हा दिल्लीवारी करणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमधील जवळपास ८० टक्के जागावाटप पूर्ण झालं असून उर्वरित जागांवर आज शिक्कामोर्तेब होण्याची शक्यता आहे. भाजप ३२ ते ३५ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती आहे. तर शिंदे गटाला ८ ते १० जागा आणि अजित पवार गटाला ३ ते ४ जागा मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीत सुद्धा जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून १३ जागांवर उमेदवार फिक्स झाले आहेत. उर्वरित जागांवर आज किंवा उद्या चर्चा होऊन तोडगा काढला जाईल, असं सूत्रांनी साम टीव्हीला सांगितलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

Mahayuti Seat Sharing Formula
Weather Forecast: देशातील ७ राज्यांना बसणार अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा तडाखा; महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com