Solapur: २० ऑक्टोबरपासून महाविद्यालयांत प्रॅक्टिकलचे वर्ग सुरू होणार विश्वभुषण लिमये
महाराष्ट्र

Solapur: २० ऑक्टोबरपासून महाविद्यालयांत प्रॅक्टिकलचे वर्ग सुरू होणार

कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांची माहिती

विश्वभुषण लिमये

सोलापूर : राज्य शासनाने 20 ऑक्टोबर 2021 पासून महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभुमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने महाविद्यालयात नियमीत वर्ग सुरु न करता सुरुवातीला फक्त प्रॅक्टीकलचे वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली आहे.

हे देखील पहा-

राज्य शासनाच्या निर्देशानुसार कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोविड टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महाविद्यालयातील थेअरी तासिका पुर्वीप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने सुरु असणार आहेत. मात्र, प्रात्यक्षिक वर्ग, प्रोजेक्ट वर्क, फिल्ड वर्क आदी शैक्षणिक बाबी या ऑफलाईन पद्धतीने सुरु होणार आहेत. यासाठी एका बॅचमध्ये फक्त 20 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

कोविड -19 चे दोन डोस पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता येणार आहे. महाविद्यालयांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. महाविद्यालयांना कोविड 19 संबंधित शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालय सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना विद्यापीठामार्फत देण्यात येणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रातही मतचोरीचा प्रकार, राजुरामध्ये ६८५० मते वाढली- राहुल गांधी

बसचालकाचा प्रताप, महिलेला Whatsapp वर पाठवले अश्लील व्हिडिओ; भररस्त्यावर महिलेनं चोपलं

Pune Firing : पुण्यात गोळीबाराचा थरार! शुल्लक कारणावरुन फायरिंग, निलेश घायवाळ टोळीतील चौघांना अटक

Meta Smart Glasses: मेटाचा नवीन स्मार्ट चष्मा लाँच, हेड-अप डिस्प्लेसह तुमच्या डोळ्यांवर येईल डिजिटल अनुभव

Rahul Gandhi: हा हायड्रोजन बॉम्ब नाही तर..., मतचोरीवरून राहुल गांधींचा EC अन् भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT