Mumbai- Goa Higway saam tv
महाराष्ट्र

Pot Holes At Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गाची खड्डयांमुळे पुन्हा चाळण, वाकेडनजीक रस्ता खचला

गाड्या खड्डयांमध्ये आपटल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होताहेत.

Siddharth Latkar

- अमाेल कलये / सचिन कदम

Mumbai Goa Highway News : गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील रस्त्याची चाळण झाली आहे. या महामार्गावरील वाकेड दरम्यानचा रस्ता खचल्याने वाहनधारकांना कसरत करीत मार्गक्रमण करावे लागत आहे. (Maharashtra News)

मुंबई - गोवा महामार्गाचे सध्या चौपदरीकरणाचं काम आहे सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई - गोवा महामार्गाला पावसाचा फटका बसू लागला आहे. या महामार्गावर रस्ता खचण्याचा प्रकार अद्यापही सुरु आहे. वाकेड दरम्यानचा रस्ता नुकताच खचला. त्याचे डागडूजीचे काम सुरु करण्यात आले आहे. रस्ता खचल्यानं महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने चालते.

वाहन चालकांची कसरत

गेली 14 वर्ष बांधकाम रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर यावर्षी देखील पुन्हा खड्डे पडले आहेत. पावसाळ्या पूर्वी महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले होते. खड्डे मुक्त महामार्गावरून यावर्षी प्रवास करता येईल असा विश्वास देण्यात आला होता, मात्र पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती पाहिलीतर हा दिलेला विश्वास फोल ठरला आहे.

वाहन चालकांना खड्डयांतुन मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. गाड्या खड्डयांमध्ये आपटल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पेण (pen) ते पोलादपुर (poladpur) दरम्यान पेण, रामवाडी, वडखळ, पळस, वाकण, सुकेळी, कोलाड, खरवली, तळेगाव, लोणेरे, नांगलवाडी, चोळई आदी ठिकाणी हे खड्डे पडले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केडीएमसीच्या रुग्णालयात गोंधळ, रुग्णाला उपचार न मिळाल्याने संतप्त नातेवाईकांचा संताप

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

Jio Special Offer: जिओचा डबल धमाका! एका प्लॅनसोबत दुसरा प्लॅन फ्री, काय आहे ऑफर जाणून घ्या

रायगडनंतर नंदुरबारमध्येही महायुतीत राडा; शिवसेना-भाजपात तेढ,भाजप आमदाराला सेनेशी युती आवडेना

SCROLL FOR NEXT