रणजीत माजगावकर
Kolhapur News: माळीण, तळीये त्यानंतर आत्ता इर्शाळवाडीमध्ये भूस्खलन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेला आहे. या घटनेनंतर सरकार आणि प्रशासन खडबडून जागं झालं आहे. तरी आजही अनेक गावं भूस्खलनाच्या छायेत आहेत. राज्यातील तब्बल 1 हजार गावांवर मृत्यूची टांगती तलवार कायम आहे. (Latest Marathi News)
माळीण, तळीये आणि आता इर्शाळवाडी ही गावांवर पत्त्यांसारखी दरड कोसळली. त्यानंतर महाराष्ट्राच्या नकाशावरून ही टुमदार गावं क्षणात नाहीशी झाली. तिथला दगड, मातीचा मलबा आजही अनेकांच्या दु:खाची करूण कहाणी सांगतोय.
कोल्हापुरातील करवीर तालुक्यात डोंगरावर वसलेलं शिपेकरवाडी गाव...527 कुटुंबांचं हे गाव कायमच भूस्लखनाच्या सावटाखाली असतं. इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीनं ग्रामस्थांना स्थलांतर होण्याची नोटीस दिली. मात्र, तात्पुरतं नको तर कायमस्वरुपी स्थलांतर करा, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
इस्रोनं नुकताच प्रसिद्ध केलेला 'लँडस्लाईड अँटलास' हा अहवाल चिंतेत टाकणारा आहे. भारतातील भूस्खलनाचा अधिक धोका असलेल्या आणि लोकसंख्येचं प्रमाण जास्त असलेल्या 147 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यामध्ये सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, मुंबई आणि मुंबई सबर्न, ठाणे या 11 जिल्ह्यांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्हा 133 व्या स्थानावर असून जिल्ह्यातील 76 गावांना भूसखलनाचा धोका आहे. ज्यामध्ये जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी, आजरा, कागल, चंदगड, गगनबावडा या तालुक्यातील अनेक गावांचा समावेश आहे.
इस्रोच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील 11 जिल्हे भूस्खलनप्रवण क्षेत्रात येतात. कोल्हापुरातील 133, साताऱ्यातील 134, नाशकातील 128 , अहमदनगरमधील 131, सिंधुदुर्गातील 114 आणि रत्नागिरीतील 129 गावांचा समावेश आहे. त्याशिवाय मुंबईतील 140 आणि मुंबई उपनगरातील 139 ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका संभवतो.
दरड कोसळल्यानंतर मदत करण्यापलीकडे शासनाच्या हातात काही उरत नाही. त्यामुळं मृत्यूच्या कुशीत कायम भीतीच्या सावटाखाली असणाऱ्या या गाव, वाड्यावस्त्यांचं कायमस्वरुपी स्थलांतर केल्यास निष्पाप जीव वाचू शकतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.