Rajesh Tope
Rajesh Tope Saam Tv
महाराष्ट्र

राज्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता; आरोग्यमंत्र्यांची माहिती

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पण कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. चीनसह अनेक देशांमध्ये कोरोना (Corona) व्हायरसच्या ओमिक्रॉनची (Omicron Variant) लाट सतत वाढत आहे. चीनमधील अनेक शहरांमध्ये कडक लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आले आहे. अश्या परिस्थितीत पुढील दोन आठवडे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. चीन आपला शेजारी असल्याने भारतानेही काळजी घेणे आवश्यक आहे.

हे देखील पहा -

त्यामुळे राज्यात तिसऱ्या लाटेनंतर चौथी लाट येणार का असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. इतर देशात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने महाराष्ट्रात सध्या मास्कमुक्ती नाहीच असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हंटलं आहे. तिसरी लाट ओसरली आहे. त्यामुळं सध्या कोरोनाची रुग्ण संख्या काही भागात शुन्यावर येवून ठेपली आहे. मात्र या भ्रमात न राहता केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पत्र प्राप्त झालं आहे. त्यानुसार कोरोनाच्या नियमांचे पालन राज्य सरकार करत आहे. त्यामुळं राज्यात सध्या मास्क मुक्ती नाहीच असं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान राज्यात 90 टक्के लसीकरण झालं असून नागरिकांनी लसीकरण करून घेवून काळजी घेण्याचं आवाहन टोपे यांनी यावेळी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SCROLL FOR NEXT