मेळघाट : भाकरीच्या शोधात शेकडो किलोमीटर दूर जाणाऱ्या मेळघाटातील गोरगरीब २० हजार आदिवासींना आता कामावरच मजुरीसह पोटभर जेवण दिले जात आहे. मात्र, दिले जात असणारे जेवण अतिशय निकृष्ठ दर्जाचे असल्याचे भयानक वास्तव आज समोर आले. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या आज मेळघाट दौऱ्यावर होत्या.
हे देखील पहा :
यावेळी मेळघाट (Melghat) मधील मनरेगाच्या (MGNRGA) कामावर जे मजूर कामे करीत आहे. त्यांना कामावरच जेवणाची व्यवस्था राज्य शासनाच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातच या योजनेचा शुभारंभ मेळघाट मध्ये झाला होता. मात्र, मजुरांना देण्यात येणारे जेवण हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे काही मजुरांनी खासदार राणा यांच्या लक्षात आणून दिले.
त्यावेळी नवनीत राणा यांनी त्या जेवणाचा दर्जा बघितला असता ते जेवण अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे राणा यांच्या निदर्शनास आले. त्यामळे आपण राज्य सरकारच्या या योजनेचा पर्दाफाश करून या संबंधी लोकसभेत (Loksabha) आवाज उठवणार असल्याचे त्यांनी यावेळी मजुरांना सांगितले.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.