महाराष्ट्र

Pooja Khedkar : IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात; दिव्यांग प्रमाणपत्र कसं मिळालं? महत्वाची माहिती आली समोर

IAS Pooja Khedkar Update : IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. पूजा खेडकर यांचं दिव्यांग प्रमाणपत्र कसं मिळालं? याची माहिती समोर आली आहे.

Vishal Gangurde

सुशील थोरात,साम टीव्ही प्रतिनिधी

अहमदनगर : प्रशिक्षाणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिवसेंदिवस अडचणी वाढू लागल्या आहेत. पूजा यांनी यूपीएससी परीक्षा ११ वेळा परीक्षा दिली होती. या परिक्षेसाठी पूजा खेडकर यांनी नावातही बदल केला होता. त्यानंतर आता पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र कसं मिळालं, याचीही माहिती समोर आली आहे.

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना ५१ टक्के दिव्यांगाचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. २०१८ साली दिव्यांगाचं ४० टक्के प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. तर २०२१ साली मानसिक आजाराचे २० टक्के असे दोन्ही मिळून ५१ टक्के दिव्यांगाचं प्रमाणपत्र देण्यात आले होते. याच पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत मोठा खुसाला समोर आला आहे.

पूजा यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून दोन प्रणामपत्र देण्यात आले होते. दोन्ही प्रमाणपत्र एकत्र करून प्रमाणपत्र देण्यात आले होते. २०१८ साली जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन मंडळाकडून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले होते. पूजा खेडकर यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्राची बेरीज ही ६० टक्के होते. मात्र, त्यांना सॉफ्टवेअर ऑटो जनरेटर करून ५१ टक्के दिव्यांगाचं प्रमाणपत्र देण्यात आलं, अशी माहिती जिल्हा शक्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली.

दरम्यान, दोन्ही प्रमाण आणि त्यांचे कागदपत्रे जिल्हा रुग्णालयाने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी यांची शहानिशा करून विभागीय आयुक्तांना या संदर्भातील अहवाल पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे.

दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करा; माहिती अधिकार कार्यकर्त्याची मागणी

पूजा खेडकर यांना दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी महापालिका आयुक्तांनी करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र देताना त्यांच्या रेशन कार्डवरचा पत्ता गृहीत धरून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आला आहे. त्यांचं ओळखपत्र महापालिकेने पाहिल्याचं दिसत नाही. तसेच औंध येथील जिल्हा रुग्णालयाने अशाच प्रकारचे प्रमाणपत्र नाकारलेला असताना महापालिका, रुग्णालयाने ते कसे दिले, याची चौकशी करण्याची मागणी कुंभार यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT