नितीन पाटणकर, साम टीव्ही पुणे
पुण्यातून आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. पुणे पोलीस आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे आई-वडिल मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा शोध घेत आहेत. त्यांच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी पाथर्डी आणि मुंबईमध्ये मोठी छापेमारी केल्याचं समोर आलंय. पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा शोध घेण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील फार्म हाऊसवर छापेमारी केलीय.
पाथर्डीसह मुंबईतील विविध भागात छापेमारी
पुणे ग्रामीण पोलिसांच्या पौड पोलीस ठाण्यात मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल (IAS officer Pooja Khedkar) आहेत. या सगळ्यांवर बंदुकीने धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकवल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पाथर्डीसह मुंबईतील विविध ठिकाणी मोठी छापेमारी सुरू आहे.
पूजा खेडकर यांच्या आई वडिलांचा शोध
पुणे पोलिसांचे पथक दाखल गुन्हाच्या तपासासाठी मुंबई पाथर्डीमध्ये पूजा खेडकर यांच्या आई वडिलांचा (Manorama Khedkar and Dilip Khedkar) शोध घेत आहेत. पूजा खेडकर यांच्या आईला शस्त्र परत करण्यासाठी देखील काल पुणे पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर आता पूजा खेडकर यांच्या पालकांशी संपर्क होत नसल्यामुळे पुणे पोलिस विविध शहरांत त्यांचा शोध घेत असल्याचं समोर आलंय.
पुणे पोलिसांची मोठी कारवाई
आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी त्यांच्या गाडीवर लाल दिवा लावला (Pune Police) होता. त्यामुळे त्यांची बदली वाशिमला करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी नवनवीन धक्कादायक खुलासे झाले. त्यांनी नाव बदलून परीक्षा दिल्याचं देखील समोर आलंय. तर त्यांनी युपीएससी प्रशासनाला दिलेल्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रावर देखील संशय व्यक्त केला जातोय. त्याचीही चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. पूजा खेडकर यांच्यानंतर त्यांचे आईवडिल देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले (Pune News) आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.