pooja zole at raigad
pooja zole at raigad saam tv
महाराष्ट्र

Raigad: रायगडावरील 'ताे' प्रकार पाेलिस दडपू इच्छितात : पुजा झाेळे

साम न्यूज नेटवर्क

- राजेश भोस्तेकर

रायगड : आठ डिसेंबर रोजी किल्ले रायगडावर (raigad) शिवसमाधीच्या ठिकाणी पुस्तक पुजनाच्या नावाखाली शिवसमाधीला मानवी हाड आणि राख लावुन विटंबना केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्या पुजा झोळे (pooja zole) यांनी केला होता. याबाबत महाड तालुका पोलिस ठाण्यात पूजा यांनी तक्रारही दाखल केली होती. शिवसमाधीला लावलेली चंदन मिश्रीत पावडर म्हणजे बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) यांच्या अस्थी असल्याचा आरोप पूजा यांनी केला होता. या प्रकरणावरून मोठा गदारोळ माजला होता. दरम्यान या प्रकरणाबाबत पोलीस यंत्रणा योग्य तपास करीत नसल्याचा संशय महाड (mahad) येथे आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्या पूजा झाेळेंनी व्यक्त केला आहे. (raigad latest marathi news)

पूजा झाेळे म्हणाल्या या प्रकरणातील संशयीत राख मिश्रीत चंदन पावडर पोलिसांनी ताब्यात घेऊन फॉरेंसीक तपासणीसाठी पाठवले होते. या घटनेला चार महिने होत असुन फॉरेन्सिक अहवाल येत नाही. तपास करणारे महाड तालुका पोलिस निरिक्षक देशमुख आणि महाड उप विभागीय पोलिस अधिकारी तांबे फोन उचलत नाहीत. भेट घेतली असता उत्तर व्यवस्थित देत नाहीत.

यामुळे हे प्रकरण दाबले जात आहे की काय असा आम्हांला संशय येत आहे. पोलिसांनी व्यवस्थित तपास करावा अन्यथा आम्हांला महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा पुजा झोळे यांनी येथे दिला. त्या म्हणाल्या या प्रकरणाचा तपास याेग्य व्हावा अशी अपेक्षा पिंपरी चिंचवडचे आमदार आण्णा बनसोडे, मावळचे आमदार सुनिल शेळके, पारनेरचे आमदार निलेश लंके, आमदार अमोल मिटकरी, मराठा क्रांती मोर्चा यांची देखील आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT